शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

ढिगाऱ्यांमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील सर्व नदीनाल्यांना मोठे पुर आले. त्यामुळे नदीकाठावरील शेतांचे नुकसान झाले. यासोबतच वेकोलिच्या कोळसा खाण क्षेत्रात मानवनिर्मीत ढिगारे तयार झाल्याने या ढिगाऱ्यांना नदी नाल्यांचे पाणी अडून शेतात शिरल्यानेही असंख्य शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आली. त्यामुळे नैसर्गीक आपत्तीसोबतच वेकोलिच्या आडमुठ्या धोरणाचाही फटका शेतकºयांना बसला.वणी ...

ठळक मुद्देवेकोलिचे आडमुठे धोरण : गावांनाही पडतो पुराचा वेढा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील सर्व नदीनाल्यांना मोठे पुर आले. त्यामुळे नदीकाठावरील शेतांचे नुकसान झाले. यासोबतच वेकोलिच्या कोळसा खाण क्षेत्रात मानवनिर्मीत ढिगारे तयार झाल्याने या ढिगाऱ्यांना नदी नाल्यांचे पाणी अडून शेतात शिरल्यानेही असंख्य शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आली. त्यामुळे नैसर्गीक आपत्तीसोबतच वेकोलिच्या आडमुठ्या धोरणाचाही फटका शेतकºयांना बसला.वणी परिसरात वेकोलिचा पसारा वाढला आहे. बहुतांश खाणी खुल्या स्वरूपाच्या असून त्यातील अधिक खाणी वर्धा व विदर्भा नदीच्या काठावर आहे. खुल्या खाणीतील कोळसा काढण्यापूर्वी उपसावी लागणारी माती वेकोलिने नियम डावलून टाकली आहे. त्याचे मानवनिर्मीत पर्वत तयार झाले आहेत. नदी नाल्यांचा प्रवाह व पुराचा विस्तार लक्षात न घेता ढिगारे टाकण्यात आले आहे. त्यामुळे या ढिगाऱ्यांना नदी-नाल्यांच्या पुराचे पाणी अडून त्याचे बॅकवॉटर शेतांमध्ये प्रवेश करतात.उकणी, बेलोरा, नायगाव, मुंगोली, जुगाद, कोलगाव, साखरा, घोन्सा या गावच्या अनेक शेतांमध्ये गेल्या १५ दिवसात पाणी शिरले. त्यामुळे पिके दोन दिवस पाण्याखाली राहिली. पिके सडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वेकोलिच्या ओव्हरबर्डनमुळे कित्येक गावांनाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जोरदार पाऊस आला की, गावकऱ्यांच्या उरात धडकी भरते. जुगाद, कोलेरा, मुंगोली या गावांना पुराचा वेढा पडतो. वेकोलिने या गावांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी गावकरी कित्येक वर्षांपासून करीत आहे. मात्र वेकोलि प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.१०-१२ खाणीपैकी काही खाणी बंद अवस्थेत आहे. तरीही त्याचे ओव्हरबर्डन पर्वत रूपाने व खाण दरी रूपाने कायम आहेत. बंद पडलेल्या खाणी बुजवून पूर्ववत जमीन सपाट केल्यास अनेक धोके टळू शकतात. विदर्भा नदीला नुकताच आलेला पुर घोन्सा खणीचे ओव्हरबर्डन फोडून खाणीत शिरला. त्यामुळे घोन्सा खाण दोनदा पुराच्या पाण्याने डच्च भरली. नदी काठावरील ढिगारे नदीत घसरू लागल्याने काही ठिकाणी वर्धा नदीचे पात्र अरूंद होत आहे. यामुळेही पुराचा विस्तार वाढून शेती पाण्याखाली येत आहे. वेकोलिच्या मनमानी कारभारावर जिल्हा प्रशासनाने निर्बंध न घातल्यास भविष्यात धोके वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस