हळद जळाली पण सौरऊर्जा नाही मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST2020-03-08T06:00:00+5:302020-03-08T06:00:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : सौरकृषिपंप योजनेंतर्गत विद्युत कंपनीने पैसे घेऊनही संच उपलब्ध करून दिला नाही. शेतात लावलेली हळद ...

हळद जळाली पण सौरऊर्जा नाही मिळाली
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सौरकृषिपंप योजनेंतर्गत विद्युत कंपनीने पैसे घेऊनही संच उपलब्ध करून दिला नाही. शेतात लावलेली हळद आणि पºहाटी पाण्याअभावी जळाल्यानंतरही कंपनीने दखल घेतली नाही. हा प्रकार कोळंबी (ता.यवतमाळ) येथे घडला. यासंदर्भात शेतकरी राजेंद्र राठोड यांनी विद्युत कंपनीच्या वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.
येथील जुना उमरसरा भागाच्या प्रेरणानगरात वास्तव्याला असलेले राजेंद्र रामरावजी राठोड यांची कोळंबी येथे शेती आहे. यात त्यांनी पाच एकरात पऱ्हाटी आणि दीड एकरात हळद लावली. शेतशेजाऱ्याकडून पाणी घेतले. दरम्यानच्या काळात सौर कृषिपंपासाठी विद्युत कंपनीकडे अर्ज करण्यात आला. कंपनीच्या सूचनेनुसार १२ हजार ३५५ रुपयांचा भरणाही केला. कंपनीने मात्र सौरऊर्जा संच पुरविला नाही. शेतशेजाऱ्यानेही पाणी थांबविले. यामुळे राठोड यांच्या शेतातील पऱ्हाटी आणि हळद वाळून गेली. यात त्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे. विद्युत कंपनीने सौर ऊर्जापंप उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. हळद आणि पºहाटी जळाल्यानंतर साधी पाहणी करण्याचे सौजन्यही कुठल्याही विभागाने दाखविले नाही. त्यामुळे रोष व्यक्त होत आहे.