मुर्धोणीत दगडाने ठेचून पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:10 IST2019-03-05T22:10:20+5:302019-03-05T22:10:44+5:30

तालुक्यातील मुर्धोणी येथे क्षुल्लक कारणावरून उफाळलेल्या वादात पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. सोनावती सूरज भवेदी (३०) असे मृत महिलेचे नाव असून सूरज गेंदा भवेदी (३५) असे आरोपीचे नाव आहे.

Crooked wife's murder in the mouth | मुर्धोणीत दगडाने ठेचून पत्नीचा खून

मुर्धोणीत दगडाने ठेचून पत्नीचा खून

ठळक मुद्देदाम्पत्य मध्य प्रदेशातील : आरोपी फरार, पोलिसांकडून जंगलात शोध

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : तालुक्यातील मुर्धोणी येथे क्षुल्लक कारणावरून उफाळलेल्या वादात पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली.
सोनावती सूरज भवेदी (३०) असे मृत महिलेचे नाव असून सूरज गेंदा भवेदी (३५) असे आरोपीचे नाव आहे. हे दाम्पत्य मध्यप्रदेशातील चोबीसा (ता.शेरपुरा जि.डिंडोरी) येथील रहिवासी आहेत. सूरज हा त्याची पत्नी सोनावती हिला सोबत घेऊन काही दिवसांपूर्वी कामाच्या शोधात वणी तालुक्यातील मुर्धोणी या गावात आला. त्याच्यासोबत इतरही काही लोक मजुरीसाठी मध्यप्रदेशातून आले होते. दोन महिन्यांपासून हे दाम्पत्य आवारी यांच्या बंड्यात राहत होते. सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास या दाम्पत्यामध्ये क्षुल्लक कारणावरून वाद सुरू झाला. यावेळी सूरज दारूच्या नशेत होता. वाद इतका विकोपाला गेला की, सूरजने संतापाच्या भरात सोनावतीवर फरशी व दगडाने हल्ला केला. त्यात गंभीर जखमी होऊन सोनावती जागीच मरण पावली.
महाशिवरात्रीनिमित्त गावात भजन सुरू असल्याने गावकऱ्यांना घटनेची माहिती मिळाली नाही. परंतु माहीती मिळताच गावातील पोलीस पाटलांनी याबाबत वणी पोलिसांना माहिती दिली.
पोलीस श्वान पथकासह घटनास्थळावर तात्काळ दाखल झाले. याप्रकरणी दुर्गावती धुर्वे हिच्या तक्रारीवरून पती सूरज गेंदा भवेदी याच्याविरोधात भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
श्वानपथकही अर्ध्यातून परतले
पत्नीला ठार मारून आरोपी सूरज जंगलाकडे पळून गेला. पोलिसांनी रात्रभर जंगलात त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. मंगळवारी दिवसभरही पोलीस त्याच्या मागावर होते. परंतु कोणताही मागमूस लागला नाही. श्वानपथकाने गावापर्यंतच्या नाल्यापर्यंत मार्ग दाखविला. तेथून ते परत आले. आरोपी हा परप्रांतीय असून त्याच्याकडे आधार कार्डही नाही. पळून जाताना त्याने स्वत:चा मोबाईल घटनास्थळीच टाकून दिला. त्याचे कोणतेही छायाचित्र त्याच्या कुटुंबाकडे नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्यात पोलिसांना चांगल्याच अडचणी येत आहेत.

Web Title: Crooked wife's murder in the mouth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून