गुन्हेगारांच्या साडेसहा लाख फिंगर प्रिंट झाल्या डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 02:54 AM2019-04-25T02:54:01+5:302019-04-25T02:54:05+5:30

ओळख सहज पटविता येणार

Criminals get printed in half a million fingerprints digital | गुन्हेगारांच्या साडेसहा लाख फिंगर प्रिंट झाल्या डिजिटल

गुन्हेगारांच्या साडेसहा लाख फिंगर प्रिंट झाल्या डिजिटल

Next

- सुरेंद्र राऊत 

यवतमाळ : गुन्ह्यांचा शोध लावण्यामध्ये घटनास्थळावर गुन्हेगाराचे मिळालेले बोटांचे ठसे महत्त्वाचा सुगावा मानला जातो. मात्र अनेकदा ठसे मिळूनही ते मॅच करण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट होती. आता संपूर्ण राज्यातील गुन्हेगाराचे फिंगर प्रिंट रेकॉर्ड डिजिटल होत आहेत. पहिल्या टप्प्यात सहा लाख ५० हजार फिंगर प्रिंट डिजिटल झाल्या आहेत. यामुळे गुन्हेगारांची ओळख सहज पटविता येणार आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) संपूर्ण देशातील फिंगर प्रिंट ब्युरोवर नियंत्रण ठेवते. राज्यातील फिंगर प्रिंट रेकॉर्ड डिजिटल करण्यासाठी ‘आॅटोमॅटिक मल्टीमॉडेल बायोमेट्रिक अ‍ॅडेंटीटी’ (अ‍ॅबीश सिस्टीम) एका खासगी कंपनीने तयार केली आहे.

प्रत्येक पोलीस ठाण्यात गुन्हेगारांचे फिंगर प्रिट व डोळे (आयरिस) इतर बायोमॅट्रीक अ‍ॅडेंटीटी घेतली जाणार आहे. यासाठी राज्यातील एक हजार १६० पोलीस ठाण्यामध्ये मॉफी टॉप (मेसा अप्लीकेशन) वापरले जाणार आहे. गुन्हा नोंद झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे बायोमॅट्रिक रेकॉर्ड तयार होणार आहेत. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ लागणार नाही.

शाई लावून ठसे घेणे हद्दपार
परंपरातगत पध्दतीत गुन्हेगाराच्या हाताला व पायाला शाई लावून त्याचे ठसे घेतले जात होते. एखादा गुन्ह्यात फिंगर प्रिंट मिळाल्या, तरी सर्वच रेकॉर्ड पडताळणी प्रत्यक्ष करावी लागत होती. एक व्यक्ती किमान १० ठसेसुध्दा दिवसभरात पडताळू शकत नव्हता. यामुळे गुन्हेगारांची ओळख पटविताना अनेक अडचणी पुढे येत होत्या. प्रत्यक्ष संपूर्ण रेकॉर्ड पडताळणी शक्यच होत नव्हती. आता ठसे तज्ज्ञांना पोर्टेबल अ‍ॅबीश देण्यात येणार आहे. थेट घटनास्थळावरच मिळालेल्या ठशांची पडताळणी करून गुन्हेगाराची ओळख पटविता येणार आहे. यामुळे पोलीस तपासाची गती निश्चितच वाढणार आहे. फिंगर प्रिंट विभागाचे काम आत चोवीस तास चालणार आहे.

फिंगर प्रिटच्या डिजिटल रेकॉर्ड संदर्भात पुणे येथे १५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अ‍ॅबीश व मर्फी टॉप अप्लिकेशनमुळे कामाची गती वाढणार आहे.
- शिवानंद बिचेवार, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, यवतमाळ.

Web Title: Criminals get printed in half a million fingerprints digital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.