नियम मोडणाऱ्या ३८ जणांवर फौजदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:00:49+5:30
यवतमाळ जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी कंबर कसली आहे. यातून जिल्ह्यात सोमवारी पहाटपासूनच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीचा अर्थ न कळाल्याने अनेकांनी वाहने रस्त्यावर काढली. यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा समावेश होता. या वाहनांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

नियम मोडणाऱ्या ३८ जणांवर फौजदारी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. कलम १४४ नुसार यवतमाळात पहाटेपासूनच कारवाई सुरू करण्यात आली. अनेकांना संचारबंदीचा अर्थ न कळल्याने वाहने रस्त्यावर आली. पोलीस प्रशासनाने अशा वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला. नियम मोडणाºया ३८ जणांवर फौजदारी कारवाई करण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंदी होती. पोलीस अधीक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून कारवाई केली. यात अनेकांना दंड ठोकण्यात आला. मंगळवारपासून ही कारवाई अधिक तीव्र होणार आहे. परजिल्ह्यातील वाहनांना सीमा बंदी करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी कंबर कसली आहे. यातून जिल्ह्यात सोमवारी पहाटपासूनच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीचा अर्थ न कळाल्याने अनेकांनी वाहने रस्त्यावर काढली. यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा समावेश होता. या वाहनांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
सकाळी ७ ते १० पर्यंत गर्दी वाढत गेल्याचे चित्र शहरात अनुभवायला मिळाले. पोलीस विभागाने राज्यमार्गावर बॅरिकेट्स लावले. त्यासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. हा बंदोबस्त चुकवित वाहन चालकांनी गल्ली बोळातून वाहने हाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे दुपारी बसस्थानक चौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. या ठिकाणी स्वत: पोलीस अधीक्षक एम. राज कुमार आणि जिल्हाधिकारी एम.डी.सिंह काही काळ उपस्थित होते. ब्लॅक कॅट कमांडोज आणि स्थानिक यंत्रणा प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करीत होते. मास्क न लावणाºया व्यक्तींना मास्क लावण्याच्या सूचना दिल्या जात होत्या.
जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात गर्दी उडाली होती. किराणा, भाजीपाला, दुध आणि बेकरीसह पेट्रोलपंपावर नागरिकांनी एकच गर्दी केली होती. बँकांमध्येही नागरिकांची गर्दी झाली होती.
साथरोग नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने ५० पेक्षा जास्त आदेश काढले. या आदेशाचे उल्लंघन करणाºया नागरिकांवर थेट कारवाईच्या सूचना आहेत. यानुसार पोलीस प्रशासनाने विविध ठिकाणी कारवाई केली.
बंदीला न जुमानता काही पानठेला चालक खर्रा विक्री करीत आहेत. त्याच प्रमाणे दारू विक्रेतेही घरून दारू विकत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. मात्र वारंवार रस्त्यावर होणारी गर्दी पाहता पोलीस प्रशासनाच्या कारवाईला पुढील काळात आणखी वेग येणार आहे. कलम १८८ प्रमाणेच कलम १४४ नुसारही कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहेत.
१०५ जण ‘होम क्वारंटाईन’
जिल्ह्यात होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांपैकी ४९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुुधारणा झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. तर सहा जण आयासोलेशन वॉर्डात उपचार घेत आहेत. आता जिल्ह्यात १०५ नागरिक होम क्वारंटाईन आहेत. जिल्ह्यातील १५४ नागरिकांना आतापर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आले होते. यातील ४९ नागरिकांचा १४ दिवसाचा कालावधी संपला आहे. त्यांना या कालावधीत कुठलेही कोरोनाचे लक्षण दिसले नाही. यामुळे त्यांना क्वारंटाईन मुक्त करण्यात आले. यामुुळे क्वारंटाईन नागरिकांची संख्या १०५ झाली आहे. आयसोलेशन वॉर्डातील तीन रुग्ण पॉझेटिव्ह आहेत. त्यांच्याही प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह््यात कोरोना विषाणूमुळे सर्वत्र काळजीचे वातावरण पसरले आहे. मात्र योग्य काळजी घेतल्यास या विषाणूचा फैलाव रोखणे शक्य आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
भाजीपाला, किराणा, दुध, बेकरी, फळे, औषधी, पेट्रोलपंप, बँक, कृषीसेवा केंद्र, वृत्तपत्रे आदींचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश आहे. त्यामुळे ही प्रतिष्ठाने सुरू राहणार आहेत. पोस्ट आॅफीस, दूरध्वनी, दूरसंचार, इंटरनेट, पाणी पुरवठा सेवा, विद्युत, पेट्रोल पंपाचे कर्मचारी, दवाखाने, पॅथॉलॉजी, प्रयोगशाळा, स्वच्छता विषयक सेवा, बँकींग सेवा वित्तीय सेवा, प्रसार माध्यमे, आयटी सेवा, उत्पादन करणाºया खसगी युनिटमध्ये ५ टक्के मनुष्यबळ वापरण्याच्या सूचना आहेत.
खासगी रुग्णालयांची ‘ओपीडी’ बंद
आंतररूग्ण तपासणी सेवा, अत्यावशक वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. तर शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याच्या सूचना आहेत. तर खासगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणी (ओडीपी) बंद ठेवण्याचे निर्देश आहे.
महोदव मंदिर पहिल्यांदाच बंद
सोमवारी शिवालयात मोठी गर्दी असते. आजपर्यंत कोणत्याच सोमवारी या मंदिराचे दार बंद राहिले नाही. मात्र संचारबंदीमुळे यवतमाळातील प्राचीन केदारेश्वराचे मंदिर बंद राहिले. अनेक भक्तांना बाहेरूनच दर्शन घेत परत जावे लागले.
आंतरजिल्हा सीमा बंद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचना देताच जिल्हा प्रशासनाने आंतरजिल्हा सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोरोनाची साथ पसरण्यापासून रोखता येणार आहे. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाने आपल्या सर्व बसफेºया रद्द केल्या आहेत.