नागपूरवरून आलेल्या इसमाविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST2020-05-07T05:00:00+5:302020-05-07T05:00:07+5:30

नागपुरपासून वणीपर्यंत सर्व सुरक्षा यंत्रणेला भेदत वणीत पोहोचलेल्या एका इसमाविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे सदर इसम नागपूर येथून वणीपर्यंत पायी आल्याचे सांगण्यात येते. तो स्थानिक लक्ष्मीनगर परिसरातील रहिवासी आहे. ही बाब परिसरातील रहिवाशांना माहित पडताच याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यानंतर आरोग्य यंत्रणेने त्याच्या घरी जाऊन त्याच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारला.

Crime against Isma from Nagpur | नागपूरवरून आलेल्या इसमाविरूद्ध गुन्हा

नागपूरवरून आलेल्या इसमाविरूद्ध गुन्हा

ठळक मुद्देवणी पोलिसांची कारवाई : हातावर शिक्का असूनही मुक्तसंचार

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : नागपुरपासून वणीपर्यंत सर्व सुरक्षा यंत्रणेला भेदत वणीत पोहोचलेल्या एका इसमाविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे सदर इसम नागपूर येथून वणीपर्यंत पायी आल्याचे सांगण्यात येते. तो स्थानिक लक्ष्मीनगर परिसरातील रहिवासी आहे. ही बाब परिसरातील रहिवाशांना माहित पडताच याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यानंतर आरोग्य यंत्रणेने त्याच्या घरी जाऊन त्याच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारला. परंतु गेल्या दोन दिवसांपासून तो हातावर शिक्का असतानाही परिसरात मुक्तपणे फिरत होता. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. यासंदर्भात पुन्हा पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली.
त्यानंतर पोलिसांनी सदर इसमाविरूद्ध भादंवि १८८, २६९ अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच त्याला घराबाहेर न पडण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली. मंगळवारी सायंकाळी पोलीस यंत्रणेसह वणी ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ.कमलाकर पोहे, डॉ.भालचंद्र आवारी यांच्यासह आरोग्य विभागाच्या पथकाने सदर इसमाच्या घरी भेट देऊन त्याला व त्याच्या कुटुंबियाला घराबाहेर न पडण्याबाबत पुन्हा एकदा ताकीद दिली. होम क्वारंटाईनचा शिक्का असुनही घराबाहेर फिरणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची वणी शहरातील ही दुसरी घटना आहे.

Web Title: Crime against Isma from Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.