कृष्णा बावणे मृत्युप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: May 10, 2014 00:57 IST2014-05-10T00:57:25+5:302014-05-10T00:57:25+5:30

येथील पत्रकार कृष्णा बावणे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी घाटंजी पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा बावणे यांचा मृत्यू नेमका कशाने झाला

Crime against the driver of the case of Krishna Bawane | कृष्णा बावणे मृत्युप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा

कृष्णा बावणे मृत्युप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा


यवतमाळ : येथील पत्रकार कृष्णा बावणे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी घाटंजी पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा बावणे यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे सुरुवातीला उघड झाले नव्हते. मात्र त्यांचा मृत्यू खासगी प्रवासी वाहनातून पडून झाल्याचे पुढे आले आहे.
कृष्णा बावणे हे लग्न समारंभासाठी घाटंजी तालुक्यातील दहेगाव येथे एका खासगी प्रवासी वाहनाने जात होते. या वाहनात त्यांना मळमळल्या सारखे झाल्याने दार उघडून ओकारी करण्याच्या प्रयत्नात असताना बावणे खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. जखमी अवस्थेत यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र घटनास्थळावरून वाहन चालक पसार झाला होता. त्यामुळे नेमका मृत्यू कशाने झाला हे कळायला मार्ग नव्हता. अखेर कैलास रामचंद्र बावणे यांनी घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून मॅक्स जीप एम.एच.२९-जे-५१६ चा चालक सै.जब्बार सै.गफ्फार (२८) रा.घोटी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime against the driver of the case of Krishna Bawane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.