ग्रामीण भागात अस्सल साहित्य निर्माण व्हावे
By Admin | Updated: September 13, 2015 02:17 IST2015-09-13T02:17:07+5:302015-09-13T02:17:07+5:30
मराठी भाषा ही माणसाचे भाषिक आयुष्य संपन्न करते. मराठी माणसासोबत मराठी भाषाही समृद्ध होत आहे, ...

ग्रामीण भागात अस्सल साहित्य निर्माण व्हावे
उमरखेड : मराठी भाषा ही माणसाचे भाषिक आयुष्य संपन्न करते. मराठी माणसासोबत मराठी भाषाही समृद्ध होत आहे, तेव्हा ग्रामीण भागातील साहित्यिकांनी अस्सल साहित्य निर्माण करावे, असे प्रतिपादन प्रा.डॉ.प्रल्हाद वावरे यांनी केले.
मुळावा येथील मिलिंद महाविद्यालयात आयोजित मराठी भाषा अभ्यास मंडळाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. प्राचार्य डॉ.भदंत खेमधम्मो महाथेरो अध्यक्षस्थानी होते. प्रा.अभय जोशी यांच्या हस्ते अभ्यास मंडळाचे उद्घाटन झाले. प्रा.अभय जोशी यांनी मराठीचे भाषिक योगदान तर प्रा.दत्ता पवार यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी करावयाच्या उपाययोजनांवर मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा.डॉ.डी.एस. पवार, प्रा.ज्योती काळबांडे, प्रा.डॉ.राहुल धुळधुळे, प्रा.विश्वास दामोधर, प्रा.प्रदीप इंगोले उपस्थित होते. मराठी विभाग प्रमुख प्रा.अनिल काळबांडे यांनी प्रास्ताविकातून अभ्यास मंडळाचा उद्देश सांगितला.
प्रसंगी समता मनवर, अरविंद मनवर, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष सिद्धांत कांबळे, उपाध्यक्ष अरविंद मनवर, सचिव शीतल गोल्हेर, विजय कांबळे, श्याम पाटे, ज्ञानेश्वर शिंदे, संगेश कांबळे, ज्योत्स्रा मनवर, अशोक हिवरे, संदीप पवार, समाधान हनवते, सारिका गुंडाप्पा, त्रिशिला बरडे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)