‘मार्जीन मनी’च्या कामांची खिरापत

By Admin | Updated: August 30, 2014 02:10 IST2014-08-30T02:10:58+5:302014-08-30T02:10:58+5:30

मार्जीन मनीची कामे सोसायट्यांना व सुशिक्षित बेकारांना देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन दिवसात तीन कोटी रुपयांच्या कामाचे वाटप केले आहे.

Cracking the works of 'Marjini Money' | ‘मार्जीन मनी’च्या कामांची खिरापत

‘मार्जीन मनी’च्या कामांची खिरापत

महागाव : मार्जीन मनीची कामे सोसायट्यांना व सुशिक्षित बेकारांना देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन दिवसात तीन कोटी रुपयांच्या कामाचे वाटप केले आहे. अधिकाऱ्यांच्या कमिशन पॅर्टनमुळे ठेकेदारांमध्ये नाराजी असून, खऱ्या अर्थाने विकासकामांना खीळ बसल्याचे दिसून येत आहे.
दलित वस्तीमधील सभागृहाच्या बांधकामासाठी दोन वेळा टेंडर बोलावूनसुद्धा एकाही कंत्राटदाराने ते भरले नाही. ओपन टेंडरला लावलेल्या कामांमध्ये कंत्राटदारांना काहीच वाचत नसल्यामुळे ते अशी कामे करण्यास उत्सुक नाही. शासनाचा मात्र दलितवस्ती सुधार योजनेविषयीचा हेतू किती प्रामाणिक आहे हे यावरून दिसून येते. ओपन टेंडर बोलावूनसुद्धा टेंडर आले नसल्यामुळे एकट्या उमरखेड विधानसभा मतदारसंघातील महागाव, उमरखेड तालुक्यात एक कोटी रुपयांचे दलितवस्तीमधील समाज मंदिराचे बांधकाम लोंबळत पडले आहे.
पुसद कार्यकारी अभियंता कार्यालयात छोट्या कंत्राटदाराची चांगलीच गळचेपी होत असून, प्रत्येक कामात कमिशनच्या टक्केवारीत वाढ झाल्याने कंत्राटदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. बहुतांश सोसायट्यांना सिमेंट रस्ता कामाचे पत्र देण्यात आले आहे. १० लाखांचे काम असेल तर काम होण्यापूर्वीच १० टक्के कमिशन मोजावे लागत असल्याने कामाचा दर्जा कसा असेल याची कल्पना न केलेली बरी. सर्वांचे मिळून कमिशन एकत्रित केल्यास संबंधीत कंत्राटदाराला सिमेंट रस्ता कसातरी अ‍ॅडजेस्ट करावा लागत आहे.
काही ठिकाणी पूर्णत्वास आलेल्या सिमेंट रस्त्याची लांबी-रूंदी कमी झाल्याचे दिसून येते. भ्रष्टाचारामुळे सिमेंट रस्ते आटरल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. महागाव तालुक्यातील मुडाना, कोठारी, डोंगरगाव, वरोडी, धारमोहा, लोहरा आणि ब्रह्मी येथील दलित वस्तीमधील मंजूर असलेल्या सभागृहाच्या बांधकामाचे टेंडर अद्याप कुणीही भरलेले नाही. त्यामुळे या कामाचे दोन वेळा टेंडर बोलाविण्यात आले आहे. उमरखेड तालुक्यातील सिंदगी, भांब, खरूस, साईबाबा ट्रस्ट इंदिरा गांधी वार्ड उमरखेड, दराटी, विठ्ठल मंदिरासमोर उमरखेड, वरूड बीबी, चातारी, बोरी, डोंगरगाव आदी ठिकाणची दलित वस्तीमध्ये बांधावयाचे सभागृहाचे टेंडर दुसऱ्यांदा काढण्यात आले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून कार्यकारी अभियंता कार्यालयात मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले आहे. पुसद येथील मार्जीन मनीची कामे पुसद येथील एकाच मोठ्या कंत्राटदाराला देण्यात आली आहे. इतरांना मात्र काहीच नाही. त्यामुळे अनेक लहान कंत्राटदारांमध्ये नाराजी पसरली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Cracking the works of 'Marjini Money'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.