एसटी कामगारांच्या प्रश्नांसाठी न्यायालयाचे दार ठोठावणार

By Admin | Updated: October 29, 2016 00:49 IST2016-10-29T00:24:01+5:302016-10-29T00:49:24+5:30

एसटी महामंडळातील कामगार परिपत्रकांच्या ओझ्याखाली दबला जात आहे.

The court will knock the door of the ST workers | एसटी कामगारांच्या प्रश्नांसाठी न्यायालयाचे दार ठोठावणार

एसटी कामगारांच्या प्रश्नांसाठी न्यायालयाचे दार ठोठावणार


औरंगाबाद : जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त असतानादेखील सातत्याने आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना सामावून घेण्यास टाळाटाळ केली जाते. रिक्त जागांवर पदस्थापना देण्यात यावी, या मागणी जिल्हा परिषद मुख्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आज २४ वा दिवस असून, यापुढे हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार शिक्षकांनी केला असून, ३ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा भास्कर आढाव यांनी दिला आहे.
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना आढाव म्हणाले की, ५ नोव्हेंबरपासून जि. प. मुख्यालयासमोर आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणासाठी संबंधित जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून रीतसर रजा घेऊन अनेक शिक्षक उपोषणात सहभागी झालेले आहेत. परीक्षेच्या वेळी काही शिक्षक परत आपापल्या जिल्हा परिषद अखत्यारीत शाळांवर सेवेत रुजू झाले. तेव्हा संबंधित शिक्षकांच्या कुटुंबियांनी साखळी उपोषणामध्ये सहभाग घेतला.
आज शुक्रवारी साखळी उपोषणाचा २४ वा दिवस आहे. आतापर्यंत एकाही वेळी जि. प. प्रशासन अथवा शिक्षणाधिकाऱ्यांकडून चर्चेसाठी निमंत्रण आलेले नाही. सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सहायक शिक्षकांच्या ११५ जागा, पदवीधर पदोन्नती न झालेल्या भाषा व समाजशास्त्र विषयांच्या ८०, विज्ञान व गणिताच्या २०१ आणि सेवानिवृत्त झाल्यामुळे ४६, अशा एकूण ४४२ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने रिक्त जागांवर आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना प्राधान्याने पदस्थापना द्यावी, प्रवर्गनिहाय त्या- त्या संवर्गातील अतिरिक्त शिक्षक अन्य संवर्गात न दाखवता त्याच संवर्गात दाखवावेत, अशी मागणी यावेळी भास्कर आढाव यांनी केली. यावेळी जि. प. सदस्या पुष्पा जाधव, सचिन साळुंके, ज्ञानेश्वर मोरे, विजय लिंबोरे, गजेंद्र बोंबले, सचिन अन्नदाते आदी शिक्षक उपस्थित होते.

Web Title: The court will knock the door of the ST workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.