हंगामी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनचा प्रश्न ग्राम विकास सचिवांच्या दरबारात
By Admin | Updated: October 5, 2016 00:32 IST2016-10-05T00:32:43+5:302016-10-05T00:32:43+5:30
हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रश्न ग्राम विकास सचिव आसीमकुमार गुप्ता यांच्याकडे मांडण्यात आला आहे.

हंगामी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनचा प्रश्न ग्राम विकास सचिवांच्या दरबारात
यवतमाळ : हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रश्न ग्राम विकास सचिव आसीमकुमार गुप्ता यांच्याकडे मांडण्यात आला आहे. मंगळवारी मंत्रालयात विविध संघटनांच्या मागण्यांसंदर्भात लावण्यात आलेल्या मिटींगमध्ये महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी कृती समितीतर्फे जुन्या पेन्शनचा मुद्दा रेटून धरण्यात आला.
हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमधून आरोग्यसेवक (पु) झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांची प्रथम हंगामी नियुक्तीची तारीख ग्राह्य धरून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी कृती समितीने लावून धरली आहे. प्रसंगी समितीचे राज्याध्यक्ष राजेश फुटाणे यांनी हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमधून आरोग्यसेवक झालेल्या कर्मचाऱ्यांवर कशाप्रकारे अन्याय झाला, हे पटवून दिले. सदर प्रश्नावर चर्चेसाठी कृती समितीला पुन्हा आमंत्रित केले असल्याची माहिती राज्य सचिव कैलास पुरी यांनी दिली. मंत्रालयात मिटींगप्रसंगी राज्य सरचिटणीस प्रदीप होले, राज्य कार्याध्यक्ष प्रशांत बागुल, महासचिव दिनानाथ जोंधळे, कार्याध्यक्ष अनिल पुंडगे, सरचिटणीस अविनाश दांडगे, उपाध्यक्ष शाहीर शेख, वसंत शिरसे, संघटक मोहन दहेकर, अमोल सोनार, अजय जोगदंड, मनोहर काटकर, अजय घावडे, सहसचिव संदीप कुटे, कोषाध्यक्ष साहेबराव राठोड, रमेश साळवे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)