शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विषारी औषध प्राशन करून प्रेमी युगुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 18:36 IST

मृत विशाल आणि पूनम यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जाते. हे दोघेही बुधवारी रात्री या परिसरात आल्याचे व आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. गुरुवारी दुपारी मृतदेह आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

ठळक मुद्देवरूड शिवारातील घटना गुढाई टेकडीजवळ आढळले मृतदेह

यवतमाळ : आर्णी तालुक्यातील वरूड (तुका) परिसरातील जंगलात प्रेमी युगुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

विशाल दत्ता आगीरकर (२८, रा. राणी धानोरा, ता. आर्णी) व पूनम संजय राऊत (१८, रा. बोंडगव्हाण, ता. माहूर, जि. नांदेड), अशी मृत प्रेमी युगुलाची नावे आहेत. गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास परिसरातील गुढाई टेकडीजवळ दोघांचेही मृतदेह आढळले. गुढा येथील पोलीस पाटील नितीन खोडे यांनी याबाबत पारवा पोलिसांना माहिती दिली. सहायक फौजदार गजानन शेजूलकार, हवालदार सुरेश येलपूलवार यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले.

मृत विशाल आणि पूनम यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जाते. हे दोघेही बुधवारी रात्री या परिसरात आल्याचे व आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. गुरुवारी दुपारी मृतदेह आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पारवा पोलिसांनी तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

गुरुवारी दुपारी घटनास्थळी पूनमची आई आणि विशालचे वडील दाखल झाले होते. त्यांनीच दोघांची ओळख पटविली. दरम्यान, विशाल गेल्या दोन ते चार वर्षांपासून कामानिमित्त बोंडगव्हाण येथे पूनम हिच्या घरी वास्तव्याला असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे पूनमची आई नात्याने विशालची मावशी आहे. तेथील वास्तव्यात त्यांचे प्रेमसंबंध फुलले. मात्र, नात्याने ही बाब शक्य नसल्याचे दोघांच्याही लक्षात आले असावे, त्यामुळे दोघेही सोमवारीच घर सोडून गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यानंतर बुधवारी ते या परिसरात आले. येथेच त्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली.

घटनास्थळी आढळली विषाची बाटली

पारवा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तेथे विषाची रिकामी बाटली, दोघांच्याही चपला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, पर्स आदी वस्तू आढळल्या. विषाची बाटली आढळल्याने त्यांनी आत्महत्याच केल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला.

बोंडगव्हाण येथील तरुणी संदर्भात सिंदखेड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याबाबतची तक्रार नाही. मात्र, तरुणीने गुढाई टेकडीजवळ आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर गावात माहिती घेतली. मृत विशाल आणि पूनम दोघेही सख्खे मावस भाऊ-बहीण असल्याचे समजले. बोंडगव्हाण आणि राणी धानोरा या गावातील अंतर साडेतीन किलोमीटर एवढे आहे. प्रेमप्रकरणातून आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

- भालचंद्र तिडके, सहायक पोलीस निरीक्षक, सिंदखेड, ता. माहूर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू