शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

देशाचे अखंडत्व भूषणावह

By admin | Updated: January 28, 2017 02:24 IST

विविध जाती, धर्म, पंथांचा हा देश असूनही केवळ भारतीय राज्यघटनेमुळे संपूर्ण देश एकसंघ राहिला आहे.

पालकमंत्री : प्रजासत्ताक दिन मुख्य ध्वजारोहण सोहळायवतमाळ : विविध जाती, धर्म, पंथांचा हा देश असूनही केवळ भारतीय राज्यघटनेमुळे संपूर्ण देश एकसंघ राहिला आहे. स्वातंत्र्यानंतर देशात स्थापन झालेल्या लोकशाहीने देशबांधवात विश्वास आणि आत्मियता निर्माण केली. यामुळेच देशाचे अखंडत्व प्रत्येक भारतीयासाठी भूषणावह आहे. आज जगात सर्वात मोठी आणि निकोप लोकशाही म्हणून भारताचा गौरव होतो, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. येथील पोस्टल मैदानावर भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यानिमित्ताने ना. येरावार यांनी जनतेस संदेश दिला. यावेळी आमदार डॉ. अशोक उईके, नगराध्यक्ष कांचन चौधरी, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.पालकमंत्री ना. येरावार म्हणाले, राज्यघटनेच्या स्वीकारामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही, असे बिरूद भारताला मिळाले आहे. भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने लोकशाही प्रस्थापित होऊन संपूर्ण जगातील एक प्रगल्भ लोकशाही म्हणून भारताचे नाव घेतले जाते. देशात लोकशाही असल्यामुळे राज्याने सर्वच क्षेत्रात विकास केला आहे. संपूर्ण देशात प्रगती साधणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचा प्रामुख्याने उल्लेख होतो. देशाच्या आर्थिक, सामाजिक क्षेत्रातील प्रगतीमध्ये राज्य केंद्रस्थानी आहे. यापुढेही राज्य अग्रक्रम कायम राखेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.ध्वजारोहणानंतर विविध पथकांच्यावतीने पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस, वन, होमगार्ड, स्काऊट गाईड आदींच्यावतीने पथसंचलन करण्यात आले. जलदगती प्रतिसाद पथकाने दहशतवादविरोधी कारवाईचे प्रात्यक्षिक केले. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले. चंद्रबोधी घायवाटे आणि ललिता जतकर यांनी संचालन केले. (वार्ताहर)