शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

कापसाचे उत्पन्न घटणार

By admin | Updated: October 12, 2014 23:38 IST

वणी तालुका हा पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून ओळखला जातो़ मात्र यावर्षी हे पांढरे सोने पिकविणारे शेतकरी कापसाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता बळावल्याने चिंताग्रस्त बनले आहेत़

लाल्या रोगाची लागण : कापसाला हवा सहा हजार रूपये भाववणी : वणी तालुका हा पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून ओळखला जातो़ मात्र यावर्षी हे पांढरे सोने पिकविणारे शेतकरी कापसाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता बळावल्याने चिंताग्रस्त बनले आहेत़ त्यामुळे केंद्र शासनाने कापसाच्या हमी भावामध्ये भरीव वाढ करावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे़वणी क्षेत्रातील ९० टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे़ मात्र यावर्षी पावसाळ्यात पाऊस अपुरा पडला़ त्यामुळे पिकांची वाढ खुंटली़ आता तर महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतांना भेगा पडल्या आहेत़ त्यामुळे कोरडवाहू पिके संकटात सापडली आहे़ वणी क्षेत्रात कापूस, सोयाबीन व तूर ही मुख्य पिके घेतली जातात़ त्यात सोयाबीन पीक काढणीच्या वाटेवर आहेत़ सोयाबिनचेही उत्पादन समाधानकारक नाहीत, असे शेतकरी सांगत आहे़ कापूस पीक तर शेतकऱ्यांच्या आर्थिक घडीचा मोठा आधार असते़ मात्र यावर्षी पावसाने दगा दिल्याने कपाशीची झाडे वाढलीच नाहीत़ झाडांना अपेक्षेप्रमाणे फळ धारणाही झाली नाही़ एवढेच नव्हे तर आता झाडांवर लाल्या रोगांचे आक्रमण होऊ लागले आहे़ त्यामुळे कापसाचे उत्पादन शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यास साथ देईल की नाही, याविषयी शेतकरी साशंक आहेत़ दिवाळी जवळ आली, तरी अजून कापसाचे बोंड शेतकऱ्यांच्या घरी आले नाही़ त्यामुळे दिवाळी कशी साजरी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे़ सहकारी संस्थांचे व बँकाचे कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी यावर्षी शेती केली आहे़ जर उत्पादन अपेक्षेप्रमाणे झाले नाही, तर कर्ज कसे फेडावे, पुढील वर्षाचा संसाराचा गाडा कसा ओढावा, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे़ पाऊस नसल्याने तुरीच्या उत्पादनाचीही आशा राहिली नाही़ रबी पिकांची तर आशाच मावळली आहे़ ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, असे १० टक्के शेतकरी रबी पिकांची पेरणी करू शकतील़ ९० टक्के शेतकऱ्यांच्या शेतीतून सोयाबीन पीक निघाल्यानंतर जमिनी पडूनच राहण्याची चिन्हे आहेत़ शासनाने कापूस पिकांचे उत्पादन कमी झाल्यामुळे कापसाला किमान सहा हजार रूपये हमी भाव द्यावा, अशी अपेक्षा आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)