शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

पालिका कारभाराविरुद्ध नगरसेवकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 23:36 IST

शहरात नगर परिषद अस्तित्वात आहे काय असा प्रश्न उपस्थित करीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी टाऊन हॉलसमोर ठिय्या आंदोलन केले. पालिकेची सर्वसाधारण सभा सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती.

ठळक मुद्देसभा गाजली : वाढीव क्षेत्रात समस्यांचा डोंगर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात नगर परिषद अस्तित्वात आहे काय असा प्रश्न उपस्थित करीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी टाऊन हॉलसमोर ठिय्या आंदोलन केले. पालिकेची सर्वसाधारण सभा सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती. त्यापूर्वीच या नगरसेवकांनी आंदोलनाला सुरुवात केली. पालिकेच्या एकाही विभागाकडून कोणतीच सेवा दिली जात नाही, असा आरोप सदस्यांनी केला.नगरपरिषदेत समाविष्ठ झालेल्या सात ग्रामपंचायत क्षेत्रात कोणतीच सुविधा दिली जात नाही. ९६ कर्मचारी काढून टाकल्याने एक महिन्यांपासून गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे सत्ताधारी कोट्यवधींचा विकास निधी आणल्याच्या डिंगा हाकत आहे. प्रत्यक्षात मात्र वार्डातील कचरा उचलणे, नाली सफाई करणे, खड्ड्यांमध्ये मुरुम टाकणे या सारखी जुजबी कामेही होताना दिसत नसल्याचा आरोप या सदस्यांनी केला. काँग्रेसचे गटनेते चंद्रशेखर चौधरी, बबलू देशमुख, राष्ट्रवादीचे पंकज मुंदे, दर्शना इंगोले, राजू केराम, ताई देवकते, विशाल पावडे, वैशाली सवाई, पल्लवी रामटेके यांनी आंदोलन केले. मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांची लवकरच पूर्तता केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर या सदस्यांनी सभागृहात प्रवेश केला.सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करीत असताना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. वडगाव परिसरातून नगरपालिकेने अडीच कोटींचा कर गोळा केला आहे. प्रत्यक्षात मात्र २० लाखांचेही काम या भागात झाले नसल्याचा आरोप पंकज मुंदे यांनी केला. अशीच अवस्था लोहारा, वाघापूर, पिंपळगावसह सातही ग्रामपंचायत क्षेत्राचे असल्याचे सांगितले. आरोग्य व बांधकाम विभागाच्या कामकाजावर विरोधी सदस्यांनी ताशेरे ओढले. सत्ताधारी केवळ त्यांच्या प्रभागापुरताच विचार करीत असल्याचा आरोप चंद्रशेखर चौधरी यांनी केला. या बैठकीत चर्चेला आलेले सर्वच विषय मंजूर झाले. यामध्ये शहरातील चारही झोनमध्ये रस्त्याचे डांबरीकरणाने पॅच दुरुस्त करणे, टंचाई काळात साफ झालेल्या विहिरींवर जाळी बसविणे, नगरोत्थान महाअभियान आदी कामांचा समावेश आहे.कमी मनुष्यबळात सेवा देण्याचे आव्हानकमी मनुष्यबळात कामाचे नियोजन केले जात आहे. शहरातील मोकाट जनावरे, डुक्कर पकडणे, घनकचरा उचलणे, कंत्राटी कर्मचारी नियुक्ती, मुरुमाच्या निविदा मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना, सभागृहात सांगितले. याशिवाय सर्व विभाग प्रमुख, झोन अभियंते, आरोग्य निरीक्षक, वार्ड शिपाई यांना मोबाईल सुरू ठेऊन तक्रारींचे निरसन करण्याबाबत निर्देश दिले असल्याचे अढागळे यांनी सांगितले. सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्या अध्यक्षतेत पार पडली. या सभेत विषय पटलावरील मलनिस्सारणाचा विषय वगळून सर्वांनाच मंजूर करण्यात आले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस