नगरसेविकेचे पती अपघातात ठार

By Admin | Updated: December 8, 2015 03:25 IST2015-12-08T03:25:55+5:302015-12-08T03:25:55+5:30

अज्ञात वाहनाने कट मारल्याने झालेल्या नॅनो कारला झालेल्या अपघातात पुसद नगरपरिषदेच्या नगरसेविकेचे पती जागीच

Corporator's husband killed in accident | नगरसेविकेचे पती अपघातात ठार

नगरसेविकेचे पती अपघातात ठार

पुसद : अज्ञात वाहनाने कट मारल्याने झालेल्या नॅनो कारला झालेल्या अपघातात पुसद नगरपरिषदेच्या नगरसेविकेचे पती जागीच ठार तर मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना पुसद-दिग्रस मार्गावरील धुंदी घाटात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
विजयराव बापूराव चिद्दरवार (७०) असे मृताचे नाव आहे. तर शैलेश विजयराव चिद्दरवार (३०) रा. कुबेर लेन पुसद असे जखमीचे नाव आहे. काँग्रेसच्या नगरसेविका शुभांगी चिद्दरवार यांचे ते पती होत. विजयराव आणि त्यांचा मुलगा शैलेश सोमवारी आपल्या नॅनो कारने पुसदहून दिग्रस येथे न्यायालयाच्या कामासाठी जात होते. त्यावेळी धुंदी घाटात त्यांच्या नॅनोला एका अज्ञात वाहनाने कट मारला. त्यामुळे चालक विजयराव यांचे नियंत्रण गेले आणि कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पलटली. अपघात एवढा भीषण होता की, विजयराव जागीच ठार झाले. त्यांचा मुलगा शैलेश गंभीर जखमी झाला. दरम्यान त्याच वेळी पुसदहून यवतमाळकडे जात असलेले पुसद अर्बनचे संचालक क्रांती कामारकर व राजू पाटील यांनी या अपघातग्रस्तांना तातडीने पुसदला आणले. त्याच्या डोक्याला मार लागला असून पुसदच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शासकीय कंत्राटदार अभिजित यांचे ते वडील होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे. मंगळवार ८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता पुसदच्या मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. (लोकमत चमू)

Web Title: Corporator's husband killed in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.