शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : प्रवाशांची जनावरांप्रमाणे कंटेनरमध्ये कोंबून वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 14:02 IST

वाहन तपासणी दरम्यान धक्कादायक प्रकार उघड झाला.

यवतमाळ  - नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वर तेलंगाणा व महाराष्ट्र या दोन राज्याची सीमा लागली आहे. पिंपळखुटी चेकपोस्ट (ता.पांढरकवडा) येथे वाहन तपासणी दरम्यान धक्कादायक प्रकार उघड झाला. अगदी जनावराप्रमाणे ३०० जणांना कंटेनरमध्ये कोंबून तेलंगाणातून महाराष्ट्रात आणले जात होते. पोलिसांच्या सतर्कतेने ही बाब उघडकीस आली. तेलंगाणावरून निघालेला कंटेनर (एच.आर.७३/ए-६९८३) पिंपळखुटी चेकपोस्टवर पोलिसांनी तपासणीसाठी थांबविला. गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला. संशय आल्याने चेकपोस्टवरच्या पोलिसांनी कंटेनरचे कुलूप उघडायला लावले. आतले दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. जवळपास ३०० जण या कंटेनरमध्ये अक्षरश: कोंबलेल्या अवस्थेत आढळून आले. पूर्वी जनावर तस्करीसाठी या पद्धतीचा वापर केला जात होता.नागपूरवरून जनावरे कत्तलीसाठी हैदराबादला अशाप्रकारे नेण्यात येत होती. हाच अनुभव गाठिशी असल्याने तेलंगाणा सीमा सील केल्यानंतर छुप्या पद्धतीने येथील व्यक्तींना महाराष्ट्रात आणले जाईल हे गृहित धरून पोलिसांनी पडताळणी केली. त्यानंतर जवळपास ३०० जण अवैधरित्या जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचे उघड झाले. वृत्त लिहिपर्यंत या अमानवीय प्रकाराबाबत पांढरकवडा पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. कंटेनेरमधून आलेल्या नागरिकांना चेकपोस्टवरूनच तेलंगाणात परत पाठविण्यात आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYavatmalयवतमाळ