coronavirus: यवतमाळ जिल्ह्यात 24 तासात 56 जण कोरोनामुक्त, 42 नव्याने पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 07:51 PM2021-01-11T19:51:13+5:302021-01-11T19:52:10+5:30

coronavirus News : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि. 11) एकूण 222 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 42 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 180 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.

coronavirus: 56 corona free in 24 hours in Yavatmal district, 42 newly positive | coronavirus: यवतमाळ जिल्ह्यात 24 तासात 56 जण कोरोनामुक्त, 42 नव्याने पॉझिटिव्ह

coronavirus: यवतमाळ जिल्ह्यात 24 तासात 56 जण कोरोनामुक्त, 42 नव्याने पॉझिटिव्ह

Next

यवतमाळ - वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 56 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर गत 24 तासात जिल्ह्यात 42 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि. 11) एकूण 222 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 42 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 180 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 435 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 13243 झाली आहे. 24 तासात 56 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 12398 आहे. तर जिल्ह्यात एकूण 410 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 129249 नमुने पाठविले असून यापैकी 128497 प्राप्त तर 752 अप्राप्त आहेत. तसेच 115254 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Web Title: coronavirus: 56 corona free in 24 hours in Yavatmal district, 42 newly positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.