शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

थकत्या वयात कोरोनाचा वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 5:00 AM

यवतमाळ शहरातील ४६ पुरुष व ३० महिला तसेच ग्रामीण भागातील चार पुरुषांचा समावेश आहे. यासह दारव्हा १५, वणी तालुक्यात सहा, महागावमध्ये ११, पांढरकवडात तीन, दिग्रस तालुक्यात २०, बाभूळगाव तालुक्यात दोन, नेर तालुका आठ, राळेगावमध्ये एक, पुसद तालुक्यात २३, घाटंजीमध्ये सात, कळंब शहरात दहा, आर्णी तालुक्यात २२, उमरखेडमध्ये सात, तर मारेगाव शहरात सहा जणांचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला.

ठळक मुद्देदिवसभरात नऊ वृद्धांचा बळी : जिल्ह्यात २२१ नवे पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी धोकादायक ठरत असला तरी प्रामुख्याने वयोवृद्धांना अधिक धोका आहे. रविवारी एकाच दिवशी तब्बल नऊ वृद्धांचा कोरोनाने बळी घेतला. यात एकट्या यवतमाळ शहरातील चौघांचा समावेश आहे. तर वणीतील दोघे आणि पुसद, राळेगाव, कळंबमधील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. त्याचवेळी जिल्ह्याच्या विविध भागातील २२१ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या २२१ रुग्णांमध्ये १३७ पुरुष व ८४ महिला आहेत. त्यात यवतमाळ शहरातील ४६ पुरुष व ३० महिला तसेच ग्रामीण भागातील चार पुरुषांचा समावेश आहे. यासह दारव्हा १५, वणी तालुक्यात सहा, महागावमध्ये ११, पांढरकवडात तीन, दिग्रस तालुक्यात २०, बाभूळगाव तालुक्यात दोन, नेर तालुका आठ, राळेगावमध्ये एक, पुसद तालुक्यात २३, घाटंजीमध्ये सात, कळंब शहरात दहा, आर्णी तालुक्यात २२, उमरखेडमध्ये सात, तर मारेगाव शहरात सहा जणांचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला.जिल्ह्यात आतापर्यंत एकंदर सात हजार १५६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर २०९ जणांचा बळी गेला. आतापर्यंत पाच हजार ८३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ६३९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. ४७८ जण होम आयसोलेशनमध्ये आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात २८५ रुग्ण भरती आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने मार्चपासून एकंदर ६७ हजार ५१४ स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले. त्यापैकी ६६ हजार १११ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून ५८ हजार ९५५ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शिवाय १४०३ अहवालांची अद्याप वैद्यकीय महाविद्यालयाला प्रतीक्षा आहे.८३० जण कोरोनामुक्तजिल्ह्यात कोरोनाची साखळी वाढत चालली असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. रविवारी वैद्यकीय महाविद्यालयाचा आयसोलेशन वॉर्ड आणि जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमधून ८३० जणांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत तब्बल पाच हजार ८३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या