शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

कोरोनाचा वेग पडला ढिला, आश्रमशाळांचा रस्ता खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 05:00 IST

आदिवासी विकास विभागाच्या पांढरकवडा प्रकल्पातील १८ शासकीय व २८ अनुदानित तसेच पुसद प्रकल्पातील सहा शासकीय व १२ अनुदानित आश्रमशाळा दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र या शाळा निवासी स्वरूपाच्या असल्यामुळे शालेय शिक्षण विभागापेक्षाही अधिक काटेकोर  ‘एसओपी’ पाळण्याची गरज आहे. त्याकरिता प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक पूर्वतयारीसाठी झटत आहेत. 

ठळक मुद्देपांढरकवडा, पुसद प्रकल्पांकडून मुख्याध्यापकांच्या पूर्वतयारी बैठका

 लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यापाठोपाठ आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाच्या आश्रमशाळाही सुरू होण्याचे संकेत आहे. याबाबत अद्याप लेखी आदेश नसले तरी स्थानिक यंत्रणेने पूर्वतयारी सुरू केली आहे. आदिवासी विकास विभागाच्या पांढरकवडा प्रकल्पातील १८ शासकीय व २८ अनुदानित तसेच पुसद प्रकल्पातील सहा शासकीय व १२ अनुदानित आश्रमशाळा दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र या शाळा निवासी स्वरूपाच्या असल्यामुळे शालेय शिक्षण विभागापेक्षाही अधिक काटेकोर  ‘एसओपी’ पाळण्याची गरज आहे. त्याकरिता प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक पूर्वतयारीसाठी झटत आहेत. 

शालेय शिक्षण विभागाप्रमाणे आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाचा लेखी निर्णय यायचा आहे. तो येताच आश्रमशाळा सुरू होतील. मात्र या शाळा निवासी स्वरूपाच्या असल्याने तेथे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. ते सुरू आहे.  - आत्माराम धाबेप्रकल्प अधिकारी, पुसद 

काय काळजी घेणार?लेखी आदेश येणे बाकी असले तरी आदिवासी आश्रमशाळांच्या बैठका ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहे. त्यात शाळेची पूर्वतयारी केली जात आहे. 

कोरोना काळात गावाकडे परतलेल्या विद्यार्थ्यांशी शिक्षकांमार्फत संपर्क केला जात आहे. पालकांना विश्वास घेऊन वाटचाल सुरू आहे. 

आश्रमशाळा निवासी स्वरूपाच्या असल्यामुळे विशेष काळजी घेतली जात आहे. शाळा अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे तेथील धान्य वाळवून घेतले गेले. तर बेडची कापड धुवून घेतली गेली आहे. 

वर्गखोल्यांची दुरुस्ती केली गेली. तर वर्गखोल्या व वसतिगृह पूर्णपणे सॅनिटाईज करून घेतल्यानंतरच आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना आणले जाणार आहे. कोरोनामुळे दक्षता घेतली जात आहे. 

कोविड सेंटरसाठी शासनाकडून ताब्यात

रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे अधिग्रहीत केलेले वसतिगृह व आश्रमशाळा आता प्रशासनाने मोकळ्या केल्या आहे. सॅनिटाईज करून या इमारती विद्यार्थ्यांसाठी वापरण्यास सज्ज आहे. 

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याSchoolशाळा