शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

लग्नांच्या सप्तपदीलाही कोरोनाचा अडसर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 5:00 AM

शहरात एकंदर ५६ मंगल कार्यालये आहेत. दिवाळीनंतर दरवर्षी येथे धडाधड बुकींग होत होती. यंदा मात्र बुकींगचा पत्ता नाही. लाॅकडाऊन अनलाॅक झाल्यानंतर विवाह खूप जुळत आहेत. पण हे विवाह घरच्या घरी उरकविले जात आहे. किंवा अत्यल्प पाहुण्यांना निमंत्रित करून एखाद्या हाॅटेलमध्ये ‘सेलिब्रेशन’ केले जात आहे. काहीजण प्रशासनाच्या नियमानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत एक दिवस लग्न उरकून दुसऱ्या दिवशी घरीच भरपूर पाहुण्यांना बोलावून जेवणावळी करीत आहेत.

ठळक मुद्देसोयरिक जुळवाजुळव वाढली

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेले अनेक दिवस कोरोना व लाॅकडाऊनमुळे विवाह सोहळे थांबले होते. मात्र आता अनलाॅक प्रक्रिया सुरू झाली आणि लग्नाचे मुहूर्तही भरपूर आलेत. त्यामुळे विवाह सोहळे वाढत आहेत. पण कोरोनाची धास्ती कायम असल्याने प्रशासनाने नियमावली कायम ठेवली आहे. त्यामुळे दिवाळीपासून सुरू होणाऱ्या लग्नांच्या धुमधडाक्याला कोरोनेचा अडसर कायम आहे.शहरात एकंदर ५६ मंगल कार्यालये आहेत. दिवाळीनंतर दरवर्षी येथे धडाधड बुकींग होत होती. यंदा मात्र बुकींगचा पत्ता नाही. लाॅकडाऊन अनलाॅक झाल्यानंतर विवाह खूप जुळत आहेत. पण हे विवाह घरच्या घरी उरकविले जात आहे. किंवा अत्यल्प पाहुण्यांना निमंत्रित करून एखाद्या हाॅटेलमध्ये ‘सेलिब्रेशन’ केले जात आहे. काहीजण प्रशासनाच्या नियमानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत एक दिवस लग्न उरकून दुसऱ्या दिवशी घरीच भरपूर पाहुण्यांना बोलावून जेवणावळी करीत आहेत.

मंगल कार्यालयांना बुकींगची प्रतीक्षादिवाळीनंतर लग्नाचे मुहूर्त भरपूर आहे आणि लाॅकडाऊनही शिथिल झाले आहे. त्यामुळे मंगल कार्यालयांमध्ये पटापट बुकींग होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात काहीही बुकींग होत नसल्याचे मंगल कार्यालय चालकांनी सांगितले. शासनाने उपस्थितीवरील मर्यादा हटविण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

हाॅटेलमध्ये मर्यादित ‘पॅकेज’सध्या लग्नाचे मुहूर्त भरपूर आहे. मात्र लग्नातील उपस्थितीवर मर्यादा कायम आहे. त्यामुळे कमी पाहुण्यांसाठी भलेमोठे मंगल कार्यालय बुक करण्यापेक्षा लोक टुमदार हाॅटेलमध्ये समारंभ करीत आहेत. तेथे छोट्या उपस्थितीकरिता विशेष ‘पॅकेज’ दिले जात आहे. हाॅटेलमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यांना ‘ईव्हेन्ट’चे स्वरूप दिले जात असल्याने प्रशासनाकडूनही कडक कारवाई होताना दिसत नाही.  

बुकींगला काही रिस्पाॅन्स नाही. कारण शासन कधी निर्णय बदलवेल, याबाबत लोकांच्या मनात साशंकता आहे. शासनाने लग्न समारंभात किमान २०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी दिली पाहिजे. - मालीराम शर्मा,         संचालक, हरितपाल मंगलम 

लग्नाचे बुकींग नसल्याने मेन्टनन्सचा खर्चही निघत नाही. शासनाने नियमच भरपूर लावून ठेवले आहेत. त्यामुळे लोक हाॅटेलमध्ये समारंभ करीत आहेत. लग्नसमारंभात परवानगीपेक्षा जादा लोक येतात. त्यांना कोण रोखणार? रोखल्यास भांडणे होतात.               - प्रमोद तातेड,         संचालक, नवजीवन मंगलम

 

टॅग्स :marriageलग्नCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या