शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
3
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
4
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
5
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
6
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
7
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
8
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
9
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
10
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
11
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
12
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
13
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
14
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
15
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
16
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
17
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
18
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
19
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
20
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

कोरोना लसीकरण ठरविणार, शाळा कधी सुरू होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 5:00 AM

यंदा जिल्ह्यातील ४३ हजार १५० विद्यार्थी पहिल्या वर्गात एकही दिवस न जाता थेट दुसऱ्या वर्गात पोहोचले आहे. येत्या सत्रात भाषा, गणित यासह कोणत्याही विषयाचे पायाभूत ज्ञान नसताना हे विद्यार्थी दुसरीमध्ये कसे टिकतील आणि शिकतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यापेक्षाही गंभीर म्हणजे पूर्वप्राथमिक शिक्षण न घेताच हजारो विद्यार्थी नर्सरी, केजी या वर्गांऐवजी थेट पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत.

ठळक मुद्देनवीन सत्र महिनाभरावर : विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची मागणी नोंदविली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाने २०२०-२१ हे शैक्षणिक सत्र शाळेविनाच पार पडले. तर आता २०२१-२२ चे शैक्षणिक सत्र सुरू होण्यासाठी केवळ महिनाभराचा कालावधी उरलेला असताना शिक्षण विभागात नव्या नियोजनाबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाही. शिक्षक, पालक यांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले तर शाळा नियोजित तारखेलाच ऑफलाईन पद्धतीने सुरू होऊ शकतील, अशी शक्यता जाणकार वर्तवित आहे. मात्र यंदा जिल्ह्यातील ४३ हजार १५० विद्यार्थी पहिल्या वर्गात एकही दिवस न जाता थेट दुसऱ्या वर्गात पोहोचले आहे. येत्या सत्रात भाषा, गणित यासह कोणत्याही विषयाचे पायाभूत ज्ञान नसताना हे विद्यार्थी दुसरीमध्ये कसे टिकतील आणि शिकतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यापेक्षाही गंभीर म्हणजे पूर्वप्राथमिक शिक्षण न घेताच हजारो विद्यार्थी नर्सरी, केजी या वर्गांऐवजी थेट पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी अद्यापही शिक्षण विभागाकडून कोणतेही नियोजन आखण्यात आलेले नाही. नव्या शैक्षणिक सत्राकरिता जिल्हा शिक्षण विभागाने बालभारतीकडे नव्या पुस्तकांची मागणीही नोंदविली आहे. शिवाय विद्यार्थ्यांकडील जुनी पुस्तके गोळा करण्याचीही मोहीम सुरु आहे. कोरोनाचे संकट ओसरले आणि लसीकरण पूर्ण झाले तर जूनअखेरीस शाळा सुरू होण्याचे संकेत आहेत. मात्र कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता यंदाही ऑनलाईनच शिक्षणाचा पर्याय स्वीकारावा लागण्याची शक्यता आहे. 

४३ हजार विद्यार्थी थेट दुसरीत जाणार  जिल्ह्यात ४३ हजार १५० विद्यार्थी एकही दिवस शाळेत न जाता आता थेट दुसरीत जाणार आहे. यात २२ हजार ३४४ मुले व २० हजार ८०६ मुलींचा समावेश आहे. 

गाव तिथे अभ्यासवर्ग भरविण्याचे नियोजन   २०२१-२२ हे शैक्षणिक सत्र महाराष्ट्रात १५ जून तर विदर्भात २६ जून रोजी सुरू होणार आहे. मात्र कोरोनामुळे शाळा उघडणार की नाही, याबाबत संभ्रम आहेच. शाळा उघडल्या किंवा उघडल्या नाही तरी जिल्हा परिषद शिक्षण विभाग गावागावात अभ्यासवर्ग सुरू करणार आहे. त्यासाठी गावातील सुशिक्षित तरुणांच्या मदतीने दहा-दहा विद्यार्थ्यांचा गट करून त्यांना शिकविले जाणार आहे. असा प्रयोग मोहा येथे यशस्वीही झाला. 

 शिक्षणाधिकारी म्हणतात... खेड्यांमध्ये अडचण नाही 

मागील वेळी पावसाळा आणि हिवाळ्यात कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात कमी आढळले. यंदाही शंभर टक्के लसीकरण झाल्यास शाळा भरविण्यास हरकत नाही. जिल्ह्यातील हजार ते बाराशे शाळांची पटसंख्या फार कमी आहे. तेथे विद्यार्थ्यांच्या आसन व्यवस्थेचीही अडचण येणार नाही. यंदा विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरुन काढले जाईल. सुरुवातीला विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती केली जाईल. त्याचा अध्ययन स्तर लक्षात घेऊन तेथून पुढे शिकविले जाईल. मागील वर्गाच्या उजळणीसाठी एससीआरटीई लवकरच उपक्रमही राबविणार आहे.  

- प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी, यवतमाळ 

विद्यार्थी, पालक, शिक्षकही शाळेसाठी उत्सुक ! 

यावर्षी आमची परीक्षा झाली नाही. मात्र मी ऑनलाईन क्लासेसमध्ये खूप अभ्यास केला. परीक्षेची पूर्ण तयारी होती. पुढच्या वर्षी तरी शाळा भरावी अशी माझी खूप इच्छा आहे. सगळीकडे कोरोनाची भीती असली तरी काळजी घेऊन शाळेत जाता येईल. शाळेत अभ्यास करण्याची वेगळीच गोडी असते. - मनन घोडाम, विद्यार्थी.

कोरोनाचे भय बाळगून शाळा बंद ठेवणे योग्य नाही. विद्यार्थ्यांना काहीही न शिकविता पुढच्या वर्गात पाठविणे म्हणजे त्यांचे नुकसान आहे. शासनाने नाटकं करण्यापेक्षा प्रॅक्टीकल गोष्टींकडे लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांना साधने उपलब्ध करून द्यावी. शिक्षकांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्यावे. - साहेबराव पवार जिल्हाध्यक्ष,  शिक्षक भारती 

गेल्या वर्षभरात मुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे जरी खरे असले तरी कोरोना संक्रमनाची तीव्रता लक्षात घेता नवीन शैक्षणिक सत्रात ऑफलाईन शाळा घेण्यापेक्षा ऑनलाईन पद्धतीनेच शाळा सुरू कराव्या. कारण अनेक शिक्षकही पाॅझिटिव्ह निघाले आहे.- गजानन पोयामपालक 

 

टॅग्स :Schoolशाळा