कोरोनाने घेतले तीन बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 05:00 IST2021-02-26T05:00:00+5:302021-02-26T05:00:07+5:30
गुरुवारी तीन मृत्यूसह तब्बल १४० जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, मृत झालेल्या व्यक्तींमध्ये यवतमाळ तालुक्यातील ४२ वर्षीय पुरुष, पुसद येथील ६५ वर्षीय महिला आणि मारेगाव तालुक्यातील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या १४० जणांमध्ये ८७ पुरुष आणि ५३ महिला आहेत.

कोरोनाने घेतले तीन बळी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाने अक्षरश: थैमान सुरु केले आहे. डिसेंबरमध्ये नियंत्रणात आल्यासारखा वाटणारा हा विषाणू आता पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. गुरुवारी एकाच दिवसात तीन जणांचा कोरोनाने बळी गेल्यामुळे आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनही हादरले आहे. तर लाॅकडाऊन होते की काय, या काळजीने सामान्य नागरिकही धास्तावले आहेत.
गुरुवारी तीन मृत्यूसह तब्बल १४० जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, मृत झालेल्या व्यक्तींमध्ये यवतमाळ तालुक्यातील ४२ वर्षीय पुरुष, पुसद येथील ६५ वर्षीय महिला आणि मारेगाव तालुक्यातील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या १४० जणांमध्ये ८७ पुरुष आणि ५३ महिला आहेत. यात यवतमाळ येथील ४५ रुग्ण, पुसद ३२, दारव्हा १९, बाभूळगाव १४, महागाव ८, पांढरकवडा ६, वणी ५, दिग्रस ३, घाटंजी ३, कळंब २, उमरखेड २ आणि इतर ठिकाणचा १ रुग्ण आहे.
गुरूवारी एकूण १ हजार ३७१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४० जण नव्याने पॉझिटिव्ह आले. तर १२३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात १३४३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६ हजार ८५६ झाली आहे. दिवसभरात ९० जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १५ हजार ५९ आहे. तर जिल्ह्यात एकूण ४५४ मृत्यूची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत १ लाख ५८ हजार ४५३ नमुने पाठविले असून यापैकी १ लाख ५६ हजार ९५० प्राप्त तर १५०३ अहवाल अप्राप्त आहेत. तसेच १ लाख ४० हजार ९४ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे.
९० जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात दरदिवशी कोरोना रुग्ण वाढत असले तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. गुरुवारी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आयसोलेशन वॉर्ड, विविध कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ९० जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.