कोरोनाने रोखला आणखी १३ जणांचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 05:00 IST2021-04-15T05:00:00+5:302021-04-15T05:00:07+5:30

कोरोना मृतांमध्ये यवतमाळ शहरातील ३९ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, तालुक्यातील ४५, ५५, ८० वर्षीय पुरुष, नेर येथील ४० वर्षीय महिला, राळेगाव तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष, आर्णी तालुक्यातील ५५ वर्षीय दोन पुरुष व ३२ वर्षीय महिला, मानोरा जि. वाशिम येथील ६८ वर्षीय पुरुष, वर्धा येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. बुधवारी पाॅझिटिव्ह आलेल्या ७९० जणांमध्ये ४६० पुरुष, ३३० महिला आहेत.

Corona stopped breathing 13 more people | कोरोनाने रोखला आणखी १३ जणांचा श्वास

कोरोनाने रोखला आणखी १३ जणांचा श्वास

ठळक मुद्दे७९० नवे पाॅझिटिव्ह रुग्ण : जिल्ह्यात आत्तापर्यंतचे सर्वाधिक ४ हजार ६२ ॲक्टिव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाचा धोका आता कहर बरसवत आहे. जिल्ह्यात २४ तासात ७९० नवे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. १३ जणांचा कोरोनाने श्वास रोखला आहे. आतापर्यंतच्या सर्वाधिक ॲक्टिव्ह पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. चार हजार ६२ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. आरोग्य यंत्रणेवर दररोज वाढत्या रुग्णांचा ताण पडत असून ऑक्सिजन, रेमडेसिविर व इतरही काही औषधांची चणचण भासायला लागली आहे. प्रशासनाला दररोज नियोजन करावे लागत आहे. 
कोरोना मृतांमध्ये यवतमाळ शहरातील ३९ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, तालुक्यातील ४५, ५५, ८० वर्षीय पुरुष, नेर येथील ४० वर्षीय महिला, राळेगाव तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष, आर्णी तालुक्यातील ५५ वर्षीय दोन पुरुष व ३२ वर्षीय महिला, मानोरा जि. वाशिम येथील ६८ वर्षीय पुरुष, वर्धा येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. बुधवारी पाॅझिटिव्ह आलेल्या ७९० जणांमध्ये ४६० पुरुष, ३३० महिला आहेत. त्यात यवतमाळातील २६१, दारव्हा येथील ९७, पुसद येथील ८५, उमरखेड ६२, पांढरकवडा ५९, कळंब ४९, वणी ४६, बाभूळगाव ३३, दिग्रस ३३, महागाव २५, आर्णी १२, मारेगाव १०, झरी ५, राळेगाव ३, नेर २ आणि इतर शहरातील आठ रुग्णांचा समावेश आहे. 
बुधवारी तीन हजार ३७६ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. यात ७९० नमुने पाॅझिटिव्ह आले. दोन हजार ५८२ नमुने निगेटिव्ह आले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांची संख्या दोन हजार १५३ वर पोहोचली आहे. गृहविलगीकरणात असलेल्यांची संख्या एक हजार ९०९ झाली आहे. आतापर्यंत एकूण पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या ही ३६ हजार ३८१ इतकी झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही ३१ हजार ५२४, कोरोनाने आतापर्यंत ७९५ जणांचा बळी घेतला आहे. जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर हा ११.२३ तर मृत्यूदर हा २.१९ इतका आहे. सातत्याने रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडण्याच्या मार्गावर आहे. 
 

 खासगी कोविडमध्ये दीडशे खाटांना नव्याने मान्यता 
 जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. १७ खासगी कोविड सेंटरवर असलेले ५१५ बेडही अपूर्ण पडत आहे. शासकीय कोविड सेंटरमध्येही अशीच अवस्था आहे. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. तरंगतुषार वारे यांनी तातडीने निरीक्षण करून नव्या दीडशे बेड्सना मान्यता दिली आहे. तर चार नवीन खासगी कोविड सेंटरला मान्यता दिली जाणार आहे. यात यवतमाळात दोन, वणी एक, उमरखेड एक येथील कोविड सेंटरचा समावेश आहे.

Web Title: Corona stopped breathing 13 more people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.