कोरोना, डेंग्यूची लक्षणे सारखीच; तातडीने चाचणी करून घ्या, आरोग्य विभागाचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:47 IST2021-08-14T04:47:32+5:302021-08-14T04:47:32+5:30
कोरोनापासून बचावासाठी तोंडावर मास्क, हात वारंवार स्वच्छ धुणे तसेच शारीरिक अंतराचे पालन, या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याची गरज आहे; तर ...

कोरोना, डेंग्यूची लक्षणे सारखीच; तातडीने चाचणी करून घ्या, आरोग्य विभागाचे आवाहन
कोरोनापासून बचावासाठी तोंडावर मास्क, हात वारंवार स्वच्छ धुणे तसेच शारीरिक अंतराचे पालन, या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याची गरज आहे; तर डेंग्यूपासून बचावासाठी डासांपासून आपला बचाव करावा. पाणी साचू देऊ नये व मच्छरदाणीचा वापर करावा. काही लक्षणे असल्यास त्वरित जवळील आरोग्य केंद्रात जाऊन चाचणी करावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मडावी यांनी केले आहे. कोरोनाचा सध्या चांगलाच प्रकोप सुरू असून, आता जेमतेम परिस्थिती नियंत्रणात आली आहे. कोरोनामध्ये नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, डोळे लाल होणे, घसा खवखवणे ही प्राथमिक लक्षणे दिसून येतात. विशेष म्हणजे, ही सर्व लक्षणे डेंग्यू रुग्णांतही असतात. त्यामुळे कोरोना की डेंग्यू? याबाबत स्पष्टपणे सांगता येत नाही. यासाठी कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी तसेच डेंग्यूसाठी एनएस-१ अँटिजन चाचणी करणे गरजेचे आहे.
बॉक्स : पाणी उकळून प्या, डासांपासून सावध राहा
पावसाळ्यात पाण्यापासून आजारांचा धोका बळावत असल्याने पाणी उकळून प्यावे. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती होत असून, डेंग्यूचा धोका बळावतो. त्यामुळे डासांपासून बचाव करावा. शिवाय कीटकजन्य आजारांपासून बचावासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवावा. कोरोनापासून बचावासाठी तोंडावर मास्क, सॅनिटायझरचा वापर व शारीरिक अंतराचे पालन करावे; तर डेंग्यूपासून बचावासाठी डासांपासून बचाव करावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.