कोरोनाने दोघांचा मृत्यू, ३१८ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 05:00 IST2021-03-10T05:00:00+5:302021-03-10T05:00:07+5:30

मंगळवारी दगावलेले दोन्ही रुग्ण यवतमाळचे आहेत. त्यात शहरातील ७५ वर्षीय महिला आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातील ५९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, पॉझिटिव्ह आलेल्या ३१८ जणांमध्ये २०८ पुरुष आणि ११० महिला आहेत. यात पुसद १०३, यवतमाळातील ६३ रुग्ण, दिग्रस ५६, वणी २३, बाभूळगाव २२, आर्णी ७, दारव्हा ७, कळंब २, महागाव १०, मारेगाव १, नेर ३, पांढरकवडा ८, उमरखेड ८, राळेगाव १ आणि ४ इतर रुग्ण आहेत.

Corona killed both, 318 positive | कोरोनाने दोघांचा मृत्यू, ३१८ पाॅझिटिव्ह

कोरोनाने दोघांचा मृत्यू, ३१८ पाॅझिटिव्ह

ठळक मुद्देदोन्ही मृतक यवतमाळातील : ॲक्टिव्ह रूग्णांचा आकडा १९३०, बळी ४८४

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना एखाद्या हैवानासारखा सारा जिल्हा आपल्या जबड्यात घेत आहे. त्यातच रोज मृत्यूसंख्या वाढत असताना मंगळवारी आणखी दोघांचा जीव कोरोनाने घेतला. तर दिवसभरात तब्बल ३१८ जणांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे ॲक्टिव्ह रूग्णांचा आकडा १९३० इतका प्रचंड मोठा झाला आहे.
मंगळवारी दगावलेले दोन्ही रुग्ण यवतमाळचे आहेत. त्यात शहरातील ७५ वर्षीय महिला आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातील ५९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, पॉझिटिव्ह आलेल्या ३१८ जणांमध्ये २०८ पुरुष आणि ११० महिला आहेत. यात पुसद १०३, यवतमाळातील ६३ रुग्ण, दिग्रस ५६, वणी २३, बाभूळगाव २२, आर्णी ७, दारव्हा ७, कळंब २, महागाव १०, मारेगाव १, नेर ३, पांढरकवडा ८, उमरखेड ८, राळेगाव १ आणि ४ इतर रुग्ण आहेत.
मंगळवारी एकूण १४८२ नागरिकांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. यापैकी ३१८ जण नव्याने पॉझिटिव्ह आले. तर ११६४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात १९३० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९ हजार ७४३ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासात २५८ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १७ हजार ३२९ इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण ४८४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत १ लाख ७४ हजार ९९८ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी १ लाख ७३ हजार ३२७ अहवाल प्राप्त झाले. तर १६७१ अहवाल अप्राप्त आहेत. तसेच १ लाख ५३ हजार ३८४ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले आहे.

२५८ जणांना रुग्णालयातून सुटी
 वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आयसोलेशन वाॅर्ड, विविध ठिकाणचे कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये कोरेानाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यातील तब्बल २५८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना मंगळवारी सुटी देण्यात आली. जिल्ह्यात एकीकडे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे कोरोनातून बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे.

Web Title: Corona killed both, 318 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.