महागाव तालुक्यात कोरोना शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 05:00 AM2020-06-02T05:00:00+5:302020-06-02T05:01:20+5:30

साधूनगर येथील त्या पॉझिटिव्ह इसमाचे महागाव येथे सोनाराचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी तो नांदेड व नंतर जळगावला सोने खरेदीसाठी गेला होता. तेथून परतल्यानंतर त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. चार दिवसांपूर्वी त्यांना सर्दी, खोकला व डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. गावात एका डॉक्टरकडे त्यांनी उपचार घेतला. नंतर पुसदच्या खासगी दवाखान्यात दाखल होण्याचे प्रयत्न केले.

Corona infiltration in Mahagaon taluka | महागाव तालुक्यात कोरोना शिरकाव

महागाव तालुक्यात कोरोना शिरकाव

Next
ठळक मुद्देसाधूनगरला पहिला पॉझिटिव्ह : प्रशासनाची गावात धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव/मुडाणा : मुडाणा लगतच्या साधूनगर (तांडा) येथील एका ४२ वर्षीय इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले. माहिती मिळताच एसडीओंसह संपूर्ण प्रशासन तेथे दाखल झाले.
साधूनगर येथील त्या पॉझिटिव्ह इसमाचे महागाव येथे सोनाराचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी तो नांदेड व नंतर जळगावला सोने खरेदीसाठी गेला होता. तेथून परतल्यानंतर त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. चार दिवसांपूर्वी त्यांना सर्दी, खोकला व डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. गावात एका डॉक्टरकडे त्यांनी उपचार घेतला. नंतर पुसदच्या खासगी दवाखान्यात दाखल होण्याचे प्रयत्न केले. मात्र त्या डॉक्टरांनी तत्काळ तेथील कोविड सेंटरला माहिती दिली. त्यामुळे त्याला प्रथम पुसद व नंतर यवतमाळच्या आयसोलेशन वॉर्डात पाठविण्यात आले. दरम्यान, रविवारी मध्यरात्री त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह येताच तालुका प्रशासनात खळबळ उडाली आहे. उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, तहसीलदार नीलेश मडके, नायब तहसीलदार डॉ.संतोष आदमुलवाड, उपनगराध्यक्ष शैलेश कोपरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जब्बार पठाण, ठाणेदार डी.के. राठोड आदींनी रविावरी व सोमवारी तातडीने साधूनगरला भेट दिली. तेथून रुग्णाच्या संपर्कातील १२ हायरिक्स नागरिकांना लगेच महागावच्या विलगीकरण कक्षात क्वारंटाईन केले.
याशिवाय त्या रुग्णाच्या संपर्कातील इतर १९ जणांना गावात घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. साधूनगर गाव सील करण्यात आले. महागावातील साराफा लाईनही सील करण्यात आली आहे.

एसडीओंच्या उपस्थितीत सराफी दुकान उघडले
सदर बाधित रुग्ण यवतमाळला असल्यामुळे त्यांचे महागाव येथील सोनार दुकानाचे कुलूप सोमवारी एसडीओंच्या उपस्थितीत तोडण्यात आले. दुकानातील रजिस्टरची पाहणी करून सदर रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. अद्यापही प्रशासन त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा युद्धपातळीवर शोध घेत आहे. साधूनगर येथे आरोग्य विभाग व आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहे.

Web Title: Corona infiltration in Mahagaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.