कोरोनामुळे भटक्या समाजाचे पाणी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:00 IST2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:00:43+5:30
या भागात पिण्याच्या पाण्याची दुसरी व्यवस्था नाही. सार्वजनिक शौचालयाजवळ हातपंप आहे. त्यावरून पाणी आणावे लागत आहे. अशा स्वरूपाचे पाणी आरोग्यासाठी घातक आहे. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने लक्ष घालावे आणि पाणी मिळवून द्यावे, अशी मागणी येथील इसू लक्ष्मण माळवे, बिलोराबाई राठोड, चिलोला पवार, बारकी पवार, अलिता आडे, सुमित्रा राठोड, माधुरी राठोड, इंदिरा माळवे, भारत राठोड, सुनिता पवार, मैना चव्हाण यांनी केली आहे.

कोरोनामुळे भटक्या समाजाचे पाणी बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनामुळे भटक्या जमाती अडचणीत आल्या आहेत. वाघाडी गावातील वडार, पारधी आणि कोलाम जमातीच्या नागरिकांना पाणी देणेच बंद केले आहे. यामुळे ३०० नागरिकांचा पाणीप्रश्न बिकट झाला आहे. या नागरिकांनी न्यायासाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे.
आर्णी रोडवरील गुरूद्वाराच्या मागच्या बाजूला पारधी, वडार, आणि कोलाम समाजाची १०५ घरे आहे. जवळपास ३०० लोक येथे राहत आहे. या भागातील नागरिकांनी लोकसहभागातून विहीर पूर्ण केली. या कामासाठी प्रत्येकी ५० रूपयांचा निधी दिला. या विहिरीवरूनच ते नेहमी पाणी भरत होते.
कोरोनाची दहशत सुरू झाली आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आता पाण्याच्या विहिरीवरून पाणी न भरण्याच्या सूचना या भागातील नागरिकांनी पारधी बांधवांना दिल्या. यामुळे भटके समाजबांधव चांगलेच अडचणीत आले आहे. या काळात मानवता जपण्याचे सोडून एका समूहालाच नाकारत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या भागात पिण्याच्या पाण्याची दुसरी व्यवस्था नाही. सार्वजनिक शौचालयाजवळ हातपंप आहे. त्यावरून पाणी आणावे लागत आहे. अशा स्वरूपाचे पाणी आरोग्यासाठी घातक आहे. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने लक्ष घालावे आणि पाणी मिळवून द्यावे, अशी मागणी येथील इसू लक्ष्मण माळवे, बिलोराबाई राठोड, चिलोला पवार, बारकी पवार, अलिता आडे, सुमित्रा राठोड, माधुरी राठोड, इंदिरा माळवे, भारत राठोड, सुनिता पवार, मैना चव्हाण यांनी केली आहे.
काम नाही, पाणी नाही, रेशन तर मिळालेच नाही
रेशनकार्ड असणाऱ्या आणि नसणाऱ्याकुटुंबांना तीन महिन्याचे धान्य मिळणार होते. मात्र अजून हे धान्य मिळालेले नाही. हाताला रोजगार नाही, पिण्याचे पाणी नाही. यामुळे या ठिकाणी वास्तव्याला असणाऱ्या नागरिकांच्या अस्तिवावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.