कोरोनाने केला ३० जणांवर वार, ८६३ नवीन रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 05:00 IST2021-04-29T05:00:00+5:302021-04-29T05:00:07+5:30
कोविड रुग्णासंदर्भात नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी कोविड नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या सनियंत्रणाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनमध्ये २४ बाय ७ कक्ष सुरू राहणार आहे. यासाठी ०७२३२-२४०७२०, २४०८४४, २५५०७७ या दूरध्वनी क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

कोरोनाने केला ३० जणांवर वार, ८६३ नवीन रुग्णांची भर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणूने बुधवारी ३० जणांवर वार करीत त्यांचा बळी घेतला. २४ तासामध्ये शासकीय कोविड रुग्णालयात २४ जणांचा मृत्यू झाला तर खासगी रुग्णालयात चार, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. ८६३ नवे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. त्यामुळे एकूण पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या ही ५० हजार ९९५ वर पोहोचली आहे. ८८० जणांनी कोरोनावर मात केल्याने एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४२ हजार ६७२ इतकी झाली आहे. आतापर्यंत एक हजार २१२ जणांचा कोरोनाने श्वास रोखला आहे.
जिल्ह्यातील पाॅझिटिव्हिटी दर हा १२.५८ इतका आहे. मृत्यूदर २.३८ इतका आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ६०, ५७, ५४, ६३ वर्षीय पुरुष व ५१, ७०, ६८ वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील ५२ वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील ३५, ५२ वर्षीय पुरुष, घाटंजी शहरातील ८०वर्षीय पुरुष, वणी येथील ५० वर्षीय पुरुष, ६० व ७० वर्षीय महिला, तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष व ३५ वर्षीय महिला, बाभूळगाव तालुक्यातील ६६ वर्षीय पुरुष, राळेगाव येथील ४०वर्षीय पुरुष, मारेगाव तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ५५ वर्षीय महिला, केळापूर तालुक्यातील ५५ वर्षीय पुरुष, आर्णीतील ४२ वर्षीय पुरुष, तालुक्यातील ५५ वर्षीय महिला, नेर तालुक्यातील ५५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दिग्रस येथे ७० वर्षीय पुरुष, घाटंजी ४५ वर्षीय पुरुष, खासगी रुग्णालयात दारव्हा येथील ६७ वर्षीय पुरुष, उमरखेड येथील ६५ वर्षीय महिला, पुसद येथील ७०वर्षी पुरुष, पांढरकवडा येथील ७२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. पाॅझिटिव्ह आलेल्या ८६३ जणांमध्ये ५२५ पुरुष आणि ३३८ महिला आहे. यात सर्वाधिक यवतमाळ शहरातील १६३ आहेत. पांढरकवडा १०४, घाटंजीतील ६९ जणांचा समावेश आहे.
कोरोना नियंत्रण कक्षातून २४ तास मिळणार मदत
कोविड रुग्णासंदर्भात नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी कोविड नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या सनियंत्रणाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनमध्ये २४ बाय ७ कक्ष सुरू राहणार आहे. यासाठी ०७२३२-२४०७२०, २४०८४४, २५५०७७ या दूरध्वनी क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या कक्षात खासगी कोविड रुग्णालयात ऑक्सिजन, रेमडेसिविर व बेडची उपलब्धता याबाबत मदत केली जाईल.