जातीय सलोखा कायम राखण्यासाठी सहकार्य करा
By Admin | Updated: March 9, 2016 00:10 IST2016-03-09T00:10:34+5:302016-03-09T00:10:34+5:30
पुसद शहराला राजकीय व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. येथे सर्व धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने नांदतात. सर्वजण एक दुसऱ्यांच्या सण,

जातीय सलोखा कायम राखण्यासाठी सहकार्य करा
पोलीस अधीक्षक : मंदिर विश्वस्त व मौलवींची सभा
पुसद : पुसद शहराला राजकीय व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. येथे सर्व धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने नांदतात. सर्वजण एक दुसऱ्यांच्या सण, उत्सवात सहभागी होत आलेले आहे. हाच जातीय सलोखा भविष्यात कायम राखण्यासाठी सहकार्य करण्याच आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी येथे केले.
पुसद शहर पोलीस ठाण्याच्यावतीने पुसद शहर व परिसरातील पुजारी, विश्वस्त आणि मौलवींची सभा मंगळवारी येथे उत्साहात पार पडली. सभेला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, शहरचे ठाणेदार अनिल कुरळकर, वसंतनगरचे ठाणेदार सदानंद मानकर, एपीआय भगवान वडतकर, गजेंद्र क्षीरसागर, धीरज चव्हाण उपस्थित होते.
सभेला शहरातील हैदरिया मस्जीदीचे मौलाना नदीम रिजवी, मस्जिद-ए-बिलालचे रियाज अहेमद, अक्सा मशिदीचे हाफीज लियाकत अली, खतीब वार्डातील मौलाना वाहीद रहेमत, नूर कॉलनीतील मौलाना युनुस बुखारी, धनकेश्वर संस्थानचे राधेश्याम शर्मा, विश्वजित सरनाईक, राधाकृष्ण मंदिराचे विश्वस्त गिरीष अग्रवाल, हटकेश्वर संस्थानचे मुकुंद कळसे आदींसह मोठ्या संख्येने मौलवी व पुजारी तथा विश्वस्त उपस्थित होते. पोलीस अधीक्षकांनी मंदिर विश्वस्त व मौलवींच्या विविध प्रश्नांचे निराकरण केले. (प्रतिनिधी)