कळंब बाजार समितीत सोयाबीन खरेदी सुरू

By Admin | Updated: October 12, 2015 02:35 IST2015-10-12T02:35:02+5:302015-10-12T02:35:02+5:30

येथील शासकीय कृषी उत्पन्न बाजार समितीत नायब तहसीलदार पऊळ यांच्या हस्ते सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.

Continued buying soybean in Kalamb market committee | कळंब बाजार समितीत सोयाबीन खरेदी सुरू

कळंब बाजार समितीत सोयाबीन खरेदी सुरू

कळंब : येथील शासकीय कृषी उत्पन्न बाजार समितीत नायब तहसीलदार पऊळ यांच्या हस्ते सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी के.बी. आठवले प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वजन काट्याचे पूजन करण्यात आले. तसेच प्रथम सोयाबीन विक्रीस आणणारे शेतकरी गोविंद गवारकर, अंकुश गवारकर आणि विलास रोकडे यांचा शाल वश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सोयाबीनला ३५०० ते ३८०० पर्यंत दर देण्यात आला आहे. यावेळी शेतकरी, व्यापारी, अडते, मापारी, हमाल आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बाजार समितीचे सचिव भालचंद्र उपासे, तुषार देशमुख, कोटुरकर, भोयर, वासेकर, बान्ते आदींनी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांनी सर्व शेतमाल बाजार समितीच्या यार्डामध्येच विक्रीस आणावा, अशी विनंती व्यवस्थापक बी.एल. उपासे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Continued buying soybean in Kalamb market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.