पुलांचे बांधकाम ठरले वादग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:00 AM2020-07-04T05:00:00+5:302020-07-04T05:00:16+5:30

सुरूवातीला या तिनही मार्गावर येणारे जुने पूल तोडून, तर काही ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम, पाईप टाकणे तसेच ठिकठिकाणी मोऱ्या तयार करण्याचे काम करण्यात आले. पुलांचे बांधकाम करताना बांधकामाच्या बाजूने वळण रस्ते काढण्यात आले. परंतु राज्यमार्ग दर्जाचे निकषाप्रमाणे आवश्यक रुंदीचे खडीकरण करुन सर्व ठिकाणी सूचना फलक लावलेले रस्ते तयार करण्यात आले नाही.

The construction of bridges became controversial | पुलांचे बांधकाम ठरले वादग्रस्त

पुलांचे बांधकाम ठरले वादग्रस्त

Next
ठळक मुद्देदारव्हा तालुका : निकष डावलून कामे, वाहनधारक त्रस्त, अपघाताची शक्यता

मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : तालुक्यात राज्य मार्गावरील पुलांचे बांधकाम निकषाप्रमाणे वळण रस्ते न करताच सुरू करण्यात आले आहे. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या आहे. काही पुलांवरुन आता वाहतूक सुरु झाली. निमार्णाधीन पुलांच्या बाजूला वळण रस्तेही काढण्यात आले. मात्र दोन्ही कच्चे रस्ते असल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून अपघाताची शक्यता बळावली आहे.
कोणत्याही रस्त्यावरील पुलांचे बांधकाम करताना किमान खडीकरण, आवश्यक रुंदी व योग्य सूचनाफलक असलेले वळण रस्ते तयार करणे आवश्यक आहे. परंतु यवतमाळ, नेरसह कुपटा रस्त्यावरील कामात नियमांना बगल देण्यात आल्याचे सांगितले जाते. दारव्हा ते यवतमाळ ३९ किलोमीटर, दारव्हा-नेर २४ किलोमीटर आणि दारव्हा-कुपटा फाटा २३ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरणाचे काम सुरु आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात पुलांची संख्या आहे. सुरूवातीला या तिनही मार्गावर येणारे जुने पूल तोडून, तर काही ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम, पाईप टाकणे तसेच ठिकठिकाणी मोऱ्या तयार करण्याचे काम करण्यात आले.
पुलांचे बांधकाम करताना बांधकामाच्या बाजूने वळण रस्ते काढण्यात आले. परंतु राज्यमार्ग दर्जाचे निकषाप्रमाणे आवश्यक रुंदीचे खडीकरण करुन सर्व ठिकाणी सूचना फलक लावलेले रस्ते तयार करण्यात आले नाही. त्याऐवजी थातुरमातुर रस्ता काढून त्यावर साईड शोल्डरच्या खोदकामातील माती टाकण्यात आल्याची तक्रार आहे. त्याचबरोबर काही बांधकामाच्या ठिकाणी रिबीनसुद्धा लावण्यात आले नाही. याप्रमाणे रस्त्यावरुन जाणाºया वाहनधारकांना त्रास होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली नाही. तिनही मार्गावरील बांधकाम झालेल्या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र पुलावर माती तशीच आहे. बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ कच्चे रस्ते पाहायला मिळतात. त्यामुळे वाहनधारकांना कच्च्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. कच्च्या रस्त्यामुळे धुळीचा त्रास होतो. रात्री बांधकाम लक्षात न आल्यास अपघात होण्याची भीती आहे. सध्या पावसामुळे या रस्त्यावर चिखल होत असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच वाहन घसरुन अपघाताची शक्यता बाळावली आहे.
एवढा सगळा त्रास होत असताना कंत्राटदार कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. खुलेआमपणे हा गंभीर प्रकार सुरु असून या कामावर नियंत्रण असणारी यंत्रणा मुग गिळून का बसली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यांवर हलगर्जीपणा होत असल्याने प्रवास करताना एखाद्या वाहनधारकाच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बांधकामाच्या चौकशीची मागणी
नागरिकांच्या तक्रारीनंतर बांधकाम झालेल्या पुलावरून वाहतूक सुरु करण्यात आली. मात्र त्या ठिकाणी माती तशीच पडून आहे. निमार्णाधीन पुलाशेजारी कच्चा वळण रस्ता आहे. या कामांची चौकशी झाल्यास सत्यता बाहेर येईल. त्यामुळे सदर सर्व वळण रस्ते राज्यमार्ग दर्जाच्या निकषाप्रमाणे झाले का, याची प्रशासकीय यंत्रणेने तपासणी करुन नियमानुसार संबंधितांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: The construction of bridges became controversial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.