शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

भूखंड घोटाळ्यातील आरोपीच्या नावावर ५० लाखांची बांधकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:16 PM

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कोट्यवधी रुपयांच्या बहुचर्चित भूखंड घोटाळ्यातील एका आरोपीच्या नावावर तब्बल ५० लाख रुपयांची बांधकामे केली ...

ठळक मुद्देभाजप पदाधिकाऱ्याचा जीव टांगणीला : पोलिसांनी बँक खाते सील केल्याने स्वत:च देयके थांबविली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोट्यवधी रुपयांच्या बहुचर्चित भूखंड घोटाळ्यातील एका आरोपीच्या नावावर तब्बल ५० लाख रुपयांची बांधकामे केली गेली. मात्र पोलिसांनी या आरोपीचे बँक खाते सील केल्याने या कामाची देयके काढताना भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे. पैसे बुडतात की काय, म्हणून या पदाधिकाऱ्याचा जीव टांगणीला लागला आहे.भाजपचा हा पदाधिकारी दारव्हा तालुक्यातील आहे. यवतमाळ-दारव्हा मार्गावरील एका गावात हा पदाधिकारी ‘लोकप्रतिनिधी’ आहे. त्याची अर्धांगिणीही गावातील महत्वाच्या पदावर लोकप्रतिनिधी आहे. या पदाधिकारी-लोकप्रतिनिधीकडेसुद्धा बांधकाम परवाना आहे. परंतु त्याची किंमत कमी आहे. शिवाय लोकप्रतिनिधीला स्वत:च्या नावावर काम करता येत नाही म्हणून या पदाधिकाºयाने यवतमाळच्या भूखंड घोटाळ्यातील एका आरोपीच्या नावावर सुमारे ५० लाख रुपयांची बांधकामे केली. आपले गाव व दारव्हा तालुक्यातील अनेक निविदा या आरोपीच्या नावावर भरल्या गेल्या. गेल्या वर्षभरात या पदाधिकाºयाचा हा डमी कंत्राटदाराचा ‘उपक्रम’ सुरू होता. घोटाळ्यातील आरोपी केवळ कागदावर कंत्राटदार होता. प्रत्यक्षात सर्व कामे तो पदाधिकारी वजा लोकप्रतिनिधीच करायचा. यानिमित्ताने लोकप्रतिनिधीच ठेकेदार बनल्याचा पुरावाही पुढे आला आहे.यवतमाळात ‘लोकमत’ने कोट्यवधींचा भूखंड घोटाळा उघडकीस आणला. ५० लाखांची बांधकामे नावावर असलेला युवक या घोटाळ्यात अडकला. एवढेच नव्हे तर गेली अनेक महिने जामीन न मिळाल्याने तो कारागृहात होता. तपासादरम्यान पोलिसांनी या आरोपीचे बँक खाते सील केले. ते अद्यापही मोकळे केले गेले नाही. बँक खातेच सील असल्याने ५० लाखांची देयके वळती करावी कशी असा पेच त्या पदाधिकाऱ्यांपुढे निर्माण झाला होता. शिवाय दुसरे बँक खाते उघडावे तर आरोपी कारागृहात त्यामुळे कोंडीत सापडलेल्या या पदाधिकाºयाने अखेर आपल्या स्तरावरच ५० लाखांची ती देयके रोखून धरली. आता त्या आरोपीला नुकताच जामीन मंजूर झाला. त्यामुळे हा पदाधिकारी आता बँकेत नवे खाते उघड म्हणून त्या आरोपीमागे तगादा लावत असल्याची माहिती आहे. ५० लाखांत बहुतांश देयके ही ग्रामपंचायतीची असल्याचे सांगितले जाते.नवे बँक खाते उघडल्यास पोलिसांकडून काही अडचण निर्माण तर होणार नाही ना या दृष्टीनेही हा पदाधिकारी चाचपणी करीत आहे. कारण भूखंड घोटाळ्यातील या आरोपीने यवतमाळातील बँकांची फसवणूक केली आहे. बेवारस भूखंड परस्पर बनावट कागदपत्रांद्वारे आपल्या नावावर करून तो बँकेत तारण ठेवला गेला व त्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलले गेले. बँका आता या आरोपीची व कुुटुंबीयांची इतर संपत्ती विकून कर्जाची वसुली करता येते का या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. अशा स्थितीत आरोपीने दुसरे बँक खाते उघडले व त्यात बांधकाम देयकाचे ५० लाख रुपये जमा झाल्यास बँकांकडून ऐनवेळी पोलिसांच्या मध्यस्थीने या रकमेवरही दावा सांगितला जाण्याचा धोका आहे. त्यामुळेच भाजपचा तो पदाधिकारी तथा लोकप्रतिनिधी ५० लाखांची देयके काढून घेण्यासाठी अतिशय सावधगिरीने पावले टाकत असल्याची माहिती आहे.सत्तेच्या मागे धाव : काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपसध्या भाजपात असलेला हा लोकप्रतिनिधी सर्व प्रथम काँग्रेसमध्ये होता. दारव्हा या ‘गृह’ तालुक्याला त्यावेळी मिळालेल्या लालदिव्यामुळे त्याने काँग्रेसमध्ये वजन वाढविले. त्यानंतर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्माण होताच त्याने राष्ट्रवादीची साथ धरली. राष्ट्रवादीचा ज्वर ओसरला व भाजप-सेनेची सत्ता आली. गावाच्या या लोकप्रतिनिधीने पुन्हा पारडे बदलत भाजपचा झेंडा हाती घेतला. सध्या हा पदाधिकारी भाजपातच असला तरी भविष्यात सत्ता बदलताच पुन्हा भाजपाला हरि‘ओम’ करण्याची शक्यता नाकारता येत नाही.