शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

संविधान दिन विशेष; शिक्षकाने जपला संविधानप्रसाराचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 11:44 IST

शिक्षकाने चक्क भारतीय संविधानाच्या प्रती मोफत वाटपाचा उपक्रम चालविला आहे. आतापर्यंत ६८५ पेक्षा अधिक प्रती वाटणाऱ्या या शिक्षकाचे नाव आहे. मजहर अहेमद खान रहेमान खान.

ठळक मुद्देआतापर्यंत वाटल्या ६८५ संविधान प्रती

प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ज्या संविधानाच्या आधारे भारताचा कारभार चालतो, त्या राष्ट्रीय ग्रंथाचे साधे दर्शनही अनेकांना घडलेले नाही. ते वाचणे, समजून घेणे तर दूरच. अशावेळी लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक सामान्य नागरिकाने संविधान वाचलेच पाहिजे, ही धडपड उराशी बाळगणाऱ्या शिक्षकाने चक्क भारतीय संविधानाच्या प्रती मोफत वाटपाचा उपक्रम चालविला आहे. आतापर्यंत ६८५ पेक्षा अधिक प्रती वाटणाऱ्या या शिक्षकाचे नाव आहे. मजहर अहेमद खान रहेमान खान.मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी भारतभरात संविधान दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त मजहर खान यांच्या उपक्रमाविषयी... ते दिग्रस येथील अंजुमन उर्दू शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी ‘संविधान भेट’ उपक्रम राबविणे सुरू केले आहे. शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या कोलुरा गावापासून या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. दरवर्षी संविधान दिनी समाजिक संस्था, ग्रामपंचायती, शाळा, वाचनालय, विविध कार्यकारी सोसायटी, पोलीस ठाणे, नगरपरिषद, तहसील अशा कार्यालयांमध्ये भारतीय संविधानाची प्रत सन्मानपूर्वक सोपविली जाते. यंदाही ते शहरात संविधानाच्या प्रती वाटप करणार आहेत.मुलीच्या लग्नातही संविधानाने स्वागतमजहर खान संविधानदिनी तर हा उपक्रम राबवितातच, पण वर्षभरही संविधान प्रसाराचा त्यांचा प्रयत्न असतो. सामाजिक कार्यात अग्रेसर व्यक्तींना त्यांच्या वाढदिवशी ते संविधान भेट देतात. अनेक विद्यार्थ्यांनाही त्यांच्याकडून संविधानाची भेट मिळाली आहे. एवढेच नव्हेतर त्यांनी स्वत:च्या मुलीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत संविधान प्रत देऊन केले होते.अनेक शासकीय कार्यालयात संविधान प्रत उपलब्ध नसल्याचे माझ्या लक्षात आले. शिवाय पुस्तकांच्या दुकानातही संविधान प्रत सहज व मोठ्या संख्येत उपलब्ध नसते. अनेक लोकांनी तर संविधान कसे आहे, हे पाहिलेलेसुद्धा नाही. त्यामुळे माझ्या परीने शक्य तितक्या लोकांपर्यंत संविधान पोचविण्याचा निर्धार केला.- मजहर खान, शिक्षक, दिग्रस

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिन