बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त संविधान स्पर्धा परीक्षा
By Admin | Updated: December 13, 2015 02:35 IST2015-12-13T02:35:41+5:302015-12-13T02:35:41+5:30
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय संविधान स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहे.

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त संविधान स्पर्धा परीक्षा
पत्रपरिषद : १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजन
यवतमाळ : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय संविधान स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बसले आहेत. २५ डिसेंबरला सकाळी १० वाजता नागभूमी आर्णी रोड येथे या स्पर्धा परीक्षेची सुरुवात होणार असल्याचे पत्रपरिषदेत आयोजन समितीकडून सांगण्यात आले.
या स्पर्धा परीक्षेचे उद्घाटन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अॅड.सोपानराव कांबळे यांच्या हस्ते केले जाणार आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, प्रकल्प संचालक विनय ठमके, अॅड. गोविंद बनसोड उपस्थित राहणार आहे. या परीक्षेच्या नियंत्रण समितीमध्ये यशू फुलझेले, अॅड.गोविंद बनसोड, नामदेवराव थूल, डी.के. भगत, धम्मा कांबळे, रवींद्र टेंभुर्णे राहणार आहे, अशी माहिती किशोर कांबळे यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी राहुल कोचे, अरुण कांबळे, तुकाराम मेश्राम, रामराव कांबळे, दादाराव पाटील, के.एस. नाईक आदी उपस्थित होते.
प्रवेश अर्जाकरिता शहरातील विविध शाळा आणि परिसरांमध्ये संपर्क केंद्र निर्माण करण्यात आले आहे. या ठिकाणीही विद्यार्थ्यांना संपर्क करता येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. (कार्यालय प्रतिनिधी)