यवतमाळकरांना दिलासा; जिल्ह्यात एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ४५ वरून ७ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 04:52 PM2020-05-16T16:52:34+5:302020-05-16T16:52:59+5:30

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या व सुरवातीला पॉझेटिव्ह रिपोर्ट्स आलेले ३८ लोक, १४ दिवसाच्या कालावधीनंतर उपचारामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

Consolation to Yavatmal; The number of active positive patients in the district has increased from 45 to 7 | यवतमाळकरांना दिलासा; जिल्ह्यात एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ४५ वरून ७ वर

यवतमाळकरांना दिलासा; जिल्ह्यात एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ४५ वरून ७ वर

Next
ठळक मुद्देपॉझेटिव्ह टू नेगेटिव्ह आणखी ३८ लोकांना सुट्टी



लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या व सुरवातीला पॉझेटिव्ह रिपोर्ट्स आलेले ३८ लोक, १४ दिवसाच्या कालावधीनंतर उपचारामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. या ३८ पैकी ३ जणांना संस्थात्मक विलागिकरण कक्षात ठेवण्यात येणार असून उर्वरित ३५ जण गृह विलागिकरणात राहणार आहे. जिल्ह्यात आता एक्टिव पॉझिटिव्हची संख्या ४५ वरून ७ वर आली आहे. विशेष म्हणजे २४, २५5 आणि२६ एप्रिल या दरम्यान सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडली. त्यानंतर रुग्ण वाढीचा वेग कमी झाला असला तरी एक-दोन, एक-दोन पॉझिटिव्ह रुग्ण येणे सुरू होते. त्यामुळे जिल्ह्याचा एकूण आकडा पाहता पाहता ९८ वर गेला होता. यापैकी तब्बल ९१ जणांना बरे करण्यात आरोग्य विभागाला लक्षणीय यश आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यसाठी ही अतिशय दिलासादायक बातमी असून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सर्व जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागाचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.
सुरवातीला केवळ यवतमाळ शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते, मात्र नंतर नेर आणि उमरखेड़ (मौजा धानोरा) येथे पॉझेटिव्ह रुग्ण आल्याने चिंतेत भर पडली. उमरखेड़ येथील पॉझेटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व हाय रिस्क व लो रिस्क अशा ६८ लोकांचे नमूने तपासनिसाठी पाठविले. हे सर्व रिपोर्ट्स नेगेटिव्ह आले आहे. तसेच नेर येथील हाय रिस्क व लो रिस्क अशा ७६ जणांचे रिपोर्ट्स तपासनिसाठी पाठवले असता यापैकी 3 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ७३ रिपोर्ट्स नेगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. उमरखेड़, महागाव, नेर आणि सर्व यवतमाळ जिल्ह्यासाठी ही अतिशय समाधानाची बाब आहे.

Web Title: Consolation to Yavatmal; The number of active positive patients in the district has increased from 45 to 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.