स्वातंत्र्य सैनिक राऊत कुटुंबीयांचे विजय दर्डांकडून सांत्वन

By Admin | Updated: September 19, 2016 01:37 IST2016-09-19T01:37:20+5:302016-09-19T01:37:20+5:30

स्वातंत्र्य संग्राम सैनिक दिवंगत श्रीपत उपाख्य बाबाराव राऊत यांच्या कुटुंबीयांचे लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन...

Consolation by the victory of freedom fighter Route family | स्वातंत्र्य सैनिक राऊत कुटुंबीयांचे विजय दर्डांकडून सांत्वन

स्वातंत्र्य सैनिक राऊत कुटुंबीयांचे विजय दर्डांकडून सांत्वन

यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सैनिक दिवंगत श्रीपत उपाख्य बाबाराव राऊत यांच्या कुटुंबीयांचे लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी सांत्वन केले.
बाबाराव राऊत यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी दर्डा यांनी वाघापूर स्थित निवासस्थानी रविवारी भेट दिली. यावेळी दर्डा यांनी बाबाराव राऊत आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या मैत्रीला उजाळा दिला. त्यांनी बाबाराव राऊत यांच्या पत्नी शांताबाई यांच्यासह मुलगा राजेंद्र, रवींद्र आणि रत्नाकर यांचे सांत्वन केले.

Web Title: Consolation by the victory of freedom fighter Route family