महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विचार करा हो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 06:00 IST2019-09-01T06:00:00+5:302019-09-01T06:00:07+5:30

यवतमाळातील तिरंगा चौकात कर्मचाऱ्यांनी धरणे देत प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने केली. जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गजानन टाके, सरचिटणीस नंदकुमार बुटे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील ७५० कर्मचारी संपात सहभागी असल्याचे सांगितले.

Consider Revenue Employees Questions Yes ... | महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विचार करा हो...

महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विचार करा हो...

ठळक मुद्देसंडे अँकर । लाक्षणिक संप, ५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंदचा इशारा, यापूर्वीच्या संपाकडे दुर्लक्षाने संताप व्यक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने राज्य शासनाकडे असलेल्या प्रलंबित मागण्या पूर्ततेसाठी लाक्षणिक संप शनिवारी करण्यात आला. मागण्या पूर्ण न झाल्यास ५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा राज्य महसूल कर्मचारी संघटनेने दिला आहे.
यवतमाळातील तिरंगा चौकात कर्मचाऱ्यांनी धरणे देत प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने केली. जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गजानन टाके, सरचिटणीस नंदकुमार बुटे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील ७५० कर्मचारी संपात सहभागी असल्याचे सांगितले. यामध्ये अव्वल कारकून, कनिष्ठ लिपिक, वाहनचालक, शिपाई या सर्वांचा सहभाग होता. महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये नायब तहसीलदार संवर्गाचा ग्रेड-पे ४३०० करावा, महसूल लिपिकाचे पदनाम महसूल सहायक करावे, आकृतीबंधाबाबत दांगट समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करावी, लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नायब तहसीलदार पदावर घेण्यात येत असलेल्या ३३ टक्के पदांची टक्केवारी कमी करून २० टक्के करावी, कर्मचाऱ्यांना परिक्षेच्या माध्यमातून वरिष्ठ पदावर जाण्याची संधी द्यावी, वर्ग चारच्या पदाची वर्ग तीनमध्ये पदोन्नती करताना तलाठी संवर्गातसुद्धा देण्यात यावे, यासह अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अमृत केदार, वैशाली होले, मनीषा शिरभाते, सुवर्णा शेंद्रे, शोभा मेश्राम, सविता मस्के, प्रमोद गुल्हाने, इंदल जाधव, शंकर आत्राम, आशीष जयसिंगपुरे आदींसह अनेक कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.

कार्यालयात शुकशुकाट
महसूल विभागातील कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कार्यालयांमध्ये संपकाळात शुकशुकाट होता. जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय याठिकाणचे कर्मचारी संपात सहभागी झाले होते. कर्मचारी उपस्थित नसल्याने नागरिकांची काही कामे होऊ शकली नाही. तसा दावा महसूल कर्मचारी संघटनेकडूनही करण्यात आला.

Web Title: Consider Revenue Employees Questions Yes ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप