महावितरणविरोधात काँग्रेसचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 21:27 IST2018-06-27T21:26:27+5:302018-06-27T21:27:25+5:30
येथील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

महावितरणविरोधात काँग्रेसचे निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : येथील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना अतिशय जीर्ण व जुन्या साहित्याद्वारे वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, कमी दाबाचा पुरवठा होणे, हलक्या पावसात वीज पुरवठा खंडित होणे, तासनतास वीज बंद राहणे, असे प्रकार नित्याचेच झाले आहे. त्यातच भर म्हणजे ज्यांच्यावर वीज कार्यालयाची जबाबदारी सोपविली आहे, तेच या कंपनीचे काही अभियंते व लाईनमन मुख्यालयी राहत नाही.
यामुळे नागरिक त्रस्त झाली असून यासंदर्भात काँग्रेसच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, नरेंद्र ठाकरे, अरूणा खंडाळकर, शीतल पोटे, अनिल देरकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.