शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरूद्ध काँग्रेसचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 22:38 IST

वाढत्या महागाईने जनता होरपळत असल्याने काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसने गुरूवारी यवतमाळ, दारव्हा, घाटंजीत आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन तहसीलदारांना सादर केले.

ठळक मुद्देराष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांना निवेदन : यवतमाळात निवेदन, दारव्हा येथे सायकल मोर्चा, घाटंजीत धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाढत्या महागाईने जनता होरपळत असल्याने काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसने गुरूवारी यवतमाळ, दारव्हा, घाटंजीत आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन तहसीलदारांना सादर केले.आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅईलची किंमत कमी असूनसुद्धा देशात सर्वत्र पेट्रोलियम पदार्थांच्या किमती सतत वाढत आहे. यामुळे इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव दररोज वाढत आहे. यात सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. या घटनेचा काँग्रेसने निषेध केला. विद्यमान सत्तारूढ पक्षांचे नेते विरोधात असताना भाववाढीबाबत आरडाओरड करायचे. विशेष म्हणजे त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅईलचे भाव आकाशाला भिडलेले असतानाही तत्कालीन सरकारने पेट्रोलियम पदार्थांचे भाव स्थिर ठेवले होते, असा दावा काँग्रेसने केला.सरकारने सामान्य जनतेला न्याय देण्याच्या दृष्टीने निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यवतमाळ येथे तहसीलदार सचिन शेजाळ यांना निवेदन देताना चंद्रशेखर चौधरी, उषाताई प्रवीण दिवटे, बबलू देशमुख, धनराज चव्हाण, विक्की राऊत, अरूण ठाकरे, हिरा मिश्रा, राजू बोडखे, अरुण गायधने, दत्ता हाडके, डॉ.संदीप तेलगोटे, कृष्णा पुसनाके, प्रदीप डंभारे, वैशाली सवई आदींसह काँगे्रस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.घाटंजीत निवेदनघाटंजी : पेट्रोल, डीझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरवाढीला आळा घालण्यासाटी तालुका काँग्रेसतर्फे थेट राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. वाढत्या महागाईमुळे देशात जनसामान्यांना मोठ्या आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सामान्यांचा त्रास लक्षात घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली. या आंदोलनात तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शेतकरी, बेरौजगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.विजय कडू, गणेश उन्नरकर, अनिल राठोड, माणिकराव मेश्राम, ओंकार जिद्देवार, खापरीचे सरपंच शंकर काकडे, मोबिन खान, मनोहर चौधरी, विनोद राठोड, विजय जिवतोडे, सागर डंभारे, मारोती प्रधान, विनोद राठोड, सुभाष खांडरे, अजित ठाकरे, सौरभ चौधरी, रूपेश कोटनाके आदींनी राष्ट्रपतींच्या नावे असलेले निवेदन तहसीलदार जी.के हामंद यांना सादर केले.दारव्हा एसडीओंना काँग्रेसचे मागण्यांचे निवेदनदारव्हा : डीझेल, पेट्रोलसह जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव व तूर खरेदीत उडालेल्या गोंधळाच्या निषेधार्थ दारव्हा येथे काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डीझेलचे भाव गगनाला भिडले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्यामुळे सामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले. दुसरीकडे तूर खरेदीत प्रचंड गोंधळ घालण्यात आल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले. अद्याप हजारो क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी तसेच पेट्रोल, डीझेल व जीवनावश्यक वस्तूंचे भाव सात दिवसांच्या आत कमी करावे, या मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीने कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसीलपर्यंत सायकल मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. उपविभागीय अधिकाऱ्यांना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश नवरंगे, माजी नगराध्यक्ष सय्यद फारूक, माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरिनाथ सिंहे, अशोकराव नरवडे, ज्ञानेश्वर कदम, जगन पाटील, गजानन बिबेकर आदींनी निवेदन दिले.

टॅग्स :congressकाँग्रेस