शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, राष्ट्रवादीचे जिल्हा कचेरीवर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 22:18 IST

राफेल लढाऊ विमान खरेदी महाघोटाळ्याची कॅगमार्फत चौकशी करावी या प्रमुख मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने मंगळवारी येथील तिरंगा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ठळक मुद्देकाँग्रेसला हवी राफेल महाघोटाळ्याची ‘कॅग’मार्फत चौकशी : पेट्रोल दरवाढ, महागाईला राष्ट्रवादीचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राफेल लढाऊ विमान खरेदी महाघोटाळ्याची कॅगमार्फत चौकशी करावी या प्रमुख मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने मंगळवारी येथील तिरंगा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.या आंदोलनात अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव यशोमती ठाकूर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी आडे, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, प्रा.वसंतराव पुरके, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सचिव संध्याताई सव्वालाखे, माजी आमदार वामनराव कासावार, विजयराव खडसे, कीर्ती गांधी, विजयाताई धोटे, नंदिनी पारवेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल ठाकरे, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब गाडे पाटील, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष माधुरीताई अराठे, शहर महिला अध्यक्ष उषाताई दिवटे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील, जीवन पाटील, काँग्रेसचे यवतमाळ शहर अध्यक्ष चंदू चौधरी, नगरसेवक बबलू देशमुख, वैशाली सवई, छोटू पावडे, जावेद अन्सारी, आरीज बेग, साजीद बेग, जिल्हा परिषद सभापती अरुणा खंडाळकर, सदस्य स्वाती येंडे, डॉ.मोहंमद नदीम, अशोक बोबडे, सिकंदर शाह, जितेेंद्र मोघे, दिनेश गोगरकर, संजय ठाकरे, जाफर खान, अतुल राऊत, अनिल गायकवाड, घनश्याम अत्रे, प्रदीप डंभारे आदी उपस्थित होते. काँग्रेसने प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तिरंगा चौकातच शेतकरी, शेतमजुर, कर्मचारी, व्यापारी आणि जनसामान्याच्या प्रश्नावर तसेच महागाईच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी युती भाजपा सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग, ज्येष्ठ नेते आमदार मनोहरराव नाईक, माजी आमदार संदीप बाजोरिया, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव घारफळकर, डॉ. आरती फुपाटे, माजी उपाध्यक्ष सदबाराव मोहटे, मुबारक तंवर, माजी सभापती प्रा.शिवाजी राठोड, सुभाष ठोकळ, अ‍ॅड. शंकरराव राठोड, जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष क्रांती धोटे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, वर्षाताई निकम, सतीश भोयर, मनीषा काटे, नरेश ठाकूर, निलेश देशमुख, रियासत अली, नंदू कुडमेथे, वणीचे डॉ. महेंद्र लोढा आदी उपस्थित होते.कृषी महाविद्यालयावर दोन्ही काँग्रेसचा जोरकाँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या मंगळवारच्या आंदोलनात यवतमाळचे शासकीय कृषी महाविद्यालय परत द्या, ही प्रमुख मागणी दिसून आली. येथे मंजूर झालेले शासकीय कृषी महाविद्यालय मुख्यमंत्र्यांच्या जन्मगावी मुल येथे पळविण्यात आले. त्यावर महाविद्यालय पळवूनही लोकप्रतिनिधी गप्प कसे ? असा सवाल ‘लोकमत’ने उपस्थित केला होता. याची दखल घेऊन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या महाविद्यालयासाठी सक्रिय झाले. दोन्ही प्रमुख विरोधी पक्षांनी आपल्या मागण्यांमध्ये कृषी महाविद्यालय परत देण्याची मागणी नोंदविली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस