पुत्र हट्टापुढे काँग्रेस आमदार हतबल

By Admin | Updated: September 3, 2014 23:44 IST2014-09-03T23:44:03+5:302014-09-03T23:44:03+5:30

मोदी सरकारमुळे महायुतीला पोषक असलेले वातावरण, मतदारांचा काँग्रेसला विरोध लक्षात घेता वणीच्या काँग्रेस आमदारांनी सावध भूमिका घेतली आहे. मात्र विधानसभेसाठी मुलगा स्वत: हट्ट करीत

Congress MLA Hattabuddhe son Hattapudhe | पुत्र हट्टापुढे काँग्रेस आमदार हतबल

पुत्र हट्टापुढे काँग्रेस आमदार हतबल

विधानसभा : मतदारांचा विरोध पाहून सावध पावित्रा
यवतमाळ : मोदी सरकारमुळे महायुतीला पोषक असलेले वातावरण, मतदारांचा काँग्रेसला विरोध लक्षात घेता वणीच्या काँग्रेस आमदारांनी सावध भूमिका घेतली आहे. मात्र विधानसभेसाठी मुलगा स्वत: हट्ट करीत असल्याने हे आमदार हतबल झाले आहेत.
वणी येथील काँग्रेसचे आमदार वामनराव कासावार सहाव्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. यापूर्वी पाच वेळा लढलेल्या निवडणुकीत त्यांना एकदाच पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी मात्र मतदारांमध्ये काहीसे काँग्रेस विरोधी वातावरण पहायला मिळत आहे. मतदारांचा काँग्रेससह आघाडीच्या विद्यमान आमदारांना विरोध आहे. या हवेचा अंदाज आमदार कासावार यांनाही आला आहे. त्यामुळेच ते सावध पावित्रा घेताना दिसत आहे. ते स्वत: विधानसभेची ही निवडणूक लढविण्याच्या मन:स्थितीत आहेत. मात्र त्याच वेळी त्यांचा मुलगा अ‍ॅड. राजीव कासावार स्वत: काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी धडपडत आहे. त्यांच्या चौकडीतील काही कार्यकर्ते त्यांना या आमदारकीसाठी ‘प्रोत्साहित’ करीत असल्याची माहिती आहे. वामनरावांनी आता थांबावे आणि आपणासाठी लॉबिंग करावी म्हणून राजीव अडून असल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगितले जाते. वामनरावांचेच देऊळ पाण्यात आहे. मुलगा उमेदवार असला तर ही राजकीय स्थिती आणखीन हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्याचा अंदाज आल्याने वामनराव कासावार ‘ही पंचवार्षिक थांब, नंतर तुझे पाहू’ असा सल्ला मुलाला देत आहे. मात्र मुलगा ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने वामनराव हतबल झाले आहे. मुलाला पुढे करून वणी मतदारसंघाची राजकीय सूत्रे अप्रत्यक्ष आपल्या हाती रहावी, पाच वर्षे ‘दुकान’ सुरळीत चालावे असा चौकडीतील काहींचा मनसुबा आहे. मात्र वामनराव हा मनसुबा यशस्वी होऊ देण्याच्या मूडमध्ये नाहीत. त्यामुळेच त्यांनी राजीवला आणखी पाच वर्ष मतदारसंघात संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे. राजीव हा सल्ला कितपत मनावर घेतात यावर वणी मतदारसंघातून काँग्रेसतर्फे पिता लढणार की पूत्र याचा फैसला अवलंबून आहे.
अशीच काहीशी स्थिती पुसदमध्येही होती. मात्र घरातूनच जोरदार लॉबिंग झाल्याने अखेर भाऊंना रिंगणातून बाहेर पडून मुलाच्या हाती सूत्रे द्यावी लागली, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Congress MLA Hattabuddhe son Hattapudhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.