वणी येथे काँग्रेसची निदर्शने

By Admin | Updated: June 26, 2017 00:53 IST2017-06-26T00:53:46+5:302017-06-26T00:53:46+5:30

वणी तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे विविध मागण्यांसाठी शुक्रवारी येथील तहसील कार्यालयावर निदर्शने

Congress manifesto at Wani | वणी येथे काँग्रेसची निदर्शने

वणी येथे काँग्रेसची निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे विविध मागण्यांसाठी शुक्रवारी येथील तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.
शेतकऱ्यांना बिनाअट सरसकट कर्जमाफी द्यावी, नाफेडने मागील तीन महिन्यापासून तुरीचे चुकारे दिले नाही, ते त्वरित द्यावे, शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी, सोयाबीन, मुंग इत्यादी नाफेडमार्फत खरेदी करावी, शेतमालाल शेती उत्पादनर खर्च अधिक ३० टक्के मुनाफा एवढे शेतमालाचे हमी भाव जाहीर करावे, भारनियमन बंद करून २४ तास वीज पुरवठा द्यावा, आदी मागण्यांसाठी हे निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात माजी आमदार वामनराव कासावार, जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ पाथ्रडकर, तालुकाध्यक्ष प्रशांत गोहोकार, शहराध्यक्ष राकेश खुराणा आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Congress manifesto at Wani