शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
4
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
5
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
6
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
7
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
8
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
9
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
10
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
11
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
12
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
13
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
14
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
15
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
16
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
17
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
18
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
19
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
20
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम

कुणबी मतविभाजनावर काँग्रेसची मदार

By admin | Updated: June 9, 2014 23:50 IST

वणी विधानसभेचे नेतृत्व करणार्‍या वामनराव कासावारांची ही चौथी टर्म असलीतरी कुणबी मतांचे विभाजन हाच त्यांच्या विजयाचा पाया राहिला आहे. कुणबी मतदारांची एकजूट ठेऊन यावेळी काँग्रेसचा खेळ

राजेश निस्ताने - यवतमाळ वणी विधानसभेचे नेतृत्व करणार्‍या वामनराव कासावारांची ही चौथी टर्म असलीतरी कुणबी मतांचे विभाजन हाच त्यांच्या विजयाचा पाया राहिला आहे. कुणबी मतदारांची एकजूट ठेऊन यावेळी काँग्रेसचा खेळ बिघडविण्याची व्युहरचना कुणबी नेत्यांनी केली आहे. गेल्या वेळी कासावारांनी शिवसेनेच्या विश्‍वास नांदेकर यांचा पराभव केला. राष्ट्रवादीच्या संजय देरकरांनी बंडखोरी करूनही वामनराव निवडून आले. कारण देरकर यांनी शिवसेनेकडे जाणार्‍या कुणबी मतांमध्ये मोठे भगदाड पाडले होते. २0१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा कासावारच राहण्याची शक्यता आहे. दुसर्‍या फळीतील नेते मुलाचे नेतृत्व स्वीकारणार नाही, याची जाणीव झाल्यानेच त्यांनी पुत्रप्रेमाला आवर घातला असावा. मारेगाव येथील जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र ठाकरे यांना काँग्रेसमधील दुसर्‍या फळीची पसंती राहू शकते.  शिवसेनेकडून माजी आमदार विश्‍वास नांदेकर यांचे नाव आघाडीवर आहे. वणी शिवसेनेत उपजिल्हा प्रमुखांचा एक गट सक्रिय आहे. या गटाकडून मात्र वेगळेच नाव रेटले जात आहे. राष्ट्रवादीतील नाराज नेते संजय देरकर यांचेही तळ्यात की मळ्यात सुरू आहे. ‘मातोश्री’वरून काही ‘आदेश’ येतो काय, यावर त्यांची पुढील ‘बांधणी’ अवलंबून आहे. तर मुळ शिवसेनेतील कुणालाही उमेदवारी द्या, पण नव्याने पक्षात आलेल्यांना संधी नको, अशी सामान्य शिवसैनिकांची भूमिका आहे. सेनेतील दुसरा गट मात्र नवख्याला पाठबळ देण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या वामनराव चटप यांना खुला पाठिंबा देणारे देरकर विधानसभेत ‘आप’च्या आश्रयाला जाण्याची शक्यता आहे. मनसेकडून नेहमीप्रमाणे राजू उंबरकर यांचे नाव चर्चेत आहे. दोन कुणबी नेत्यांचे भांडण आणि काँग्रेसचा लाभ अशी वामनराव कासावारांची खेळी राहिली आहे. त्या बळावरच ते चौथ्यांदा निवडून आले. देरकर-नांदेकर भांडत रहावे आणि आपण पुन्हा निवडून यावे, अशीच काँग्रेसची रणनिती आहे. त्यासाठी यावेळीही पडद्यामागून भक्कम ताकद दिली जाईल. ९0 हजारांपेक्षा अधिक कुणबी मतदार येथे आहेत. त्यांच्यात फूट पाडून आपली पोळी  शेकण्याची काँग्रेसची खेळी मतदारांपासून लपून राहिलेली नाही. यावेळी या खेळीला बळी पडायचे नाही, एकजूट होऊन समाजाचे नेतृत्व विधानसभेत पाठवायचे, असा निर्धार कुणबी नेत्यांनी केला आहे. हा निर्धार काँग्रेससाठी मात्र धोक्याची घंटा ठरला आहे.