बोरी सूत गिरणीवर काँग्रेसचा झेंडा

By Admin | Updated: March 29, 2016 03:26 IST2016-03-29T03:26:33+5:302016-03-29T03:26:33+5:30

तालुक्यातील बोरीअरब येथील शेतकरी सहकारी सूत गिरणीच्या निवडणुकीत काँग्रेसने एकतर्फी विजय मिळवित आपला

Congress flag on sacking mill | बोरी सूत गिरणीवर काँग्रेसचा झेंडा

बोरी सूत गिरणीवर काँग्रेसचा झेंडा

दारव्हा : तालुक्यातील बोरीअरब येथील शेतकरी सहकारी सूत गिरणीच्या निवडणुकीत काँग्रेसने एकतर्फी विजय मिळवित आपला झेंडा फडकविला. काँग्रेस समर्थित शेतकरी सहकार पॅनलने २१ पैकी १६ जागांवर विजय संपादित केला. तर शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादीची आघाडी निवडणुकीत निष्प्रभ ठरली. त्यांच्या शेतकरी विकास पॅनलला पाच जागांवर समाधान मानावे लागले.
बोरीअबर येथील शेतकरी सहकारी सूत गिरणीची निवडणूक रविवारी पार पडली. सोमवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनात सकाळी ९ वाजतापासून मतमोजणीस प्रारंभ झाला. मंगरुळपीर, मानोरा, कारंजा, आर्णी, दिग्रस, दारव्हा, नेर व बोरी येथील मतदान केंद्रावरील मतपत्रिका मतदारसंघ निहाय एकत्र करून मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. या निवडणुकीत काँग्रेसच्या शेतकरी सहकार पॅनलने १६ जागांवर यश मिळविल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला.
या निवडणुकीत कापूस उत्पादक शेतकरी मतदारसंघातून राहुल माणिकराव ठाकरे (१२१३), दुर्गाप्रसाद तिवारी (११४१), सुभाषचंद गुगलिया (११४२), दत्तात्रय ठाकरे (११५३), प्रवीण देशमुख (११२७), प्रकाश नवरंगे (११६८), पांडुरंग निमकर (११७२), हाजी मोबीन खान (१११४), अरविंद राऊत (११५६), नामदेव राऊत (११३७), प्रवीण राऊत (११३६), महिला राखीव मतदारसंघात वेणूताई ज्ञानेश्वर बोरकर (१२५५), सुरेखा रमेश ठाकरे (१२४९), इतर मागासवर्गीय मतदारसंघात विनायकराव भेंडे (१२४४), विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघात प्रकाश जाधव (१२४१), अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात विठ्ठल पवने (१२३५) हे उमेदवार विजयी झाले.
तर बिगर कापूस उत्पादक शेतकरी मतदारसंघात शेतकरी विकास पॅनलचे सुभाष ठोकळ, गोविंदराव जाधव, पुरुषोत्तम गावंडे, वहीद अहमद खान, सतीश कान्हे विजयी झाले. विशेष म्हणजे या मतदारसंघात केवळ आठच मतदाते होते. हे मतदान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे जास्त असल्याचा फायदा त्यांच्या पॅनलला झाला.
काँग्रेसच्या विजयानंतर मतमोजणी केंद्रावरून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत आमदार माणिकराव ठाकरे, माजी मंत्री संजय देशमुख, दारव्हाचे नगराध्यक्ष अशोक चिरडे, जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ सिंहे, सुमनताई राठोड, अ‍ॅड. सुधाकर जाधव, अशोक नरवाडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोरकर आदी प्रमुख नेत्यांसह विजयी उमेदवार आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

दिग्गजांना धक्का
४बोरी सूत गिरणीच्या निवडणूक निकालानंतर या परिसरात परिवर्तनाचे वारे सुरू झाल्याच्या प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रात उमटत आहे. या निवडणुकीत दोनही पॅनलकडून प्रचंड ताकद लावण्यात आली होती. पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह एक खासदार, दोन आमदार व शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची केली होती. परंतु सूत गिरणीच्या भागधारकांनी आमदार ठाकरे यांच्या पॅनलला निवडून दिले. या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यात उत्साह वाढल्याचे दिसत आहे.

Web Title: Congress flag on sacking mill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.