शिवसेनेचे रवींद्र अरगडे यांचा काँग्रेस प्रवेश
By Admin | Updated: October 27, 2016 01:05 IST2016-10-27T01:05:54+5:302016-10-27T01:05:54+5:30
शिवसेना नेते व माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे यांनी बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

शिवसेनेचे रवींद्र अरगडे यांचा काँग्रेस प्रवेश
दिग्रस : शिवसेना नेते व माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे यांनी बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. येथील शहीद स्मारकाजवळ आयोजित प्रवेश सोहळ्याला माजी राज्यमंत्री संजय देशमुख, अरविंद गादेवार, विनयकुमार बंग, शाम पाटील महिंद्रे, डॉ. मुश्ताक, सुमनताई राठोड, संजीवनी कोळसे, सरिता धुर्वे, बेबीबाई अरगडे, रामप्यारी नरळे, सुधीर भोसले आदींची मंचावर उपस्थिती होती.
मागील आठवड्यात अरविंद गादेवार व आता रवींद्र अरगडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने तालुक्यात मोठी उलथापालथ झाली आहे. यावेळी संजय देशमुख यांनी आपल्या भाषणातून पालकमंत्री संजय राठोड यांच्यावर टीका केली. या कार्यक्रमाला तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)