शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कर्जदारांसह जमानतदारांकडून सक्तीची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2022 21:46 IST

यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, अमरावती आणि नांदेडमध्ये महिला बँकेच्या १९ शाखा आहेत, त्यातील १५ शाखा  यवतमाळ जिल्ह्यात आहेत. पाच जिल्ह्यात असलेल्या शाखांमध्ये ३६ हजार ५६० ठेवीदारांचे १८५ कोटी रुपये अडकले आहेत. तर दुसरीकडे १ हजार १३ कर्जदारांनी बँकेकडून २६७ कोटी रुपयांच्या कर्जाची उचल केली आहे. या मूळ कर्जावर २०८ कोटी रुपयांचे व्याज झाले आहे. कर्जदारांनी थकीत कर्जाची परतफेड केली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बाबाजी दाते महिला बँकेचाबँकिंंग परवाना आरबीआयने रद्द केला आहे. यानंतर या ठिकाणी अवसायकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारताच अवसायक नानासाहेब चव्हाण यांनी  कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीचे  आदेश काढले आहेत. थकीत कर्जदारासह जमानतदाराकडून ४७५ कोटी रुपयांची कर्ज वसुली होणार आहे. याशिवाय ज्या खातेधारकांचे लाॅकर असेल अशांनी ते बंद करावे, असे आवाहन अवसायकांनी केले आहे.यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, अमरावती आणि नांदेडमध्ये महिला बँकेच्या १९ शाखा आहेत, त्यातील १५ शाखा  यवतमाळ जिल्ह्यात आहेत. पाच जिल्ह्यात असलेल्या शाखांमध्ये ३६ हजार ५६० ठेवीदारांचे १८५ कोटी रुपये अडकले आहेत. तर दुसरीकडे १ हजार १३ कर्जदारांनी बँकेकडून २६७ कोटी रुपयांच्या कर्जाची उचल केली आहे. या मूळ कर्जावर २०८ कोटी रुपयांचे व्याज झाले आहे. कर्जदारांनी थकीत कर्जाची परतफेड केली नाही. यातून व्याज वाढले. बँकेचा एनपीएदेखील वाढत गेला. सध्याच्या स्थितीत मूळ कर्जासह व्याजाचे रक्कम धरून ४७५ कोटी रुपये १ हजार १३ कर्जदार सभासदांकडून बँकेला वसूल करायचे आहेत. यानंतरच ठेवीदारांचे १८५ कोटी रुपये परत करता येतील. त्यामुळे अवसायक चव्हाण यांनी थकीत कर्जदारांकडून सक्तीची कर्ज वसुली करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी डीआयसीजीसीच्या माध्यमातून पाच लाखांच्या आतील २९४ कोटी रुपये परत केले आहेत. अजूनही १८५ कोटी रुपये परत करायचे आहेत. अनेक सभासदांना बँकेच्या सध्याच्या स्थितीची माहितीच नाही. त्यामुळे अशा सभासदांना क्लेम परत मिळण्यासाठी पुन्हा अर्ज करता येणार आहे. बँक ठेवीदारांचे पैसे मिळालेल्या वसुलीतून परत करणार आहे. यामुळे वसुली मोहीम महत्वाची आहे. 

एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंतच्या व्यवहाराचे होणार ऑडिट- अवसायकांनी पदभार स्वीकारल्यानंतर १ एप्रिल २०२२ ते ११ नोव्हेंबरपर्यंत पार पडलेल्या व्यवहाराच्या संपूर्ण कामकाजाचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे या काळात नेमके काय घडले, ही बाबदेखील समोर येणार आहे. ‘डीआयसीजीसी’ला २८७ कोटी परत करावे लागणार - सभासदांच्या ठेवीला सुरक्षा प्रदान करण्यासाठी विमा उतरविला जातो. त्यासाठी डीआयसीजीसीला या रकमेसाठी २८७ कोटी रुपये द्यायचे आहे. त्यातील सात कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. मात्र, इतर रक्कम अजूनही परत व्हायची आहे. 

१९ शाखांमधील कर्मचारी टप्प्याटप्प्याने कमी होणार - पाच जिल्ह्यांतील १९ शाखांमध्ये २०३ कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. तर १२ अस्थायी स्वरुपाचे कर्मचारी आहेत. बँकेचा बँकिंग परवाना रद्द झाल्याने बँकेचा आर्थिक बोझा कमी करण्यासाठी कर्मचारी कपात केली जाणार आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने पाचही जिल्ह्यांत मोहीम राबविली जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर पुढील काळात गदा येणार आहे. 

चार मालमत्ता आणि चलअचल संपत्तीवर टाच- महिला बँकेच्या चार स्वत:च्या मालमत्ता आहेत. याशिवाय वाहनदेखील आहे. या सर्व मालमत्तांवरदेखील टाच येणार आहे. यामुळे भविष्यात कर्जवसुलीसह या मालमत्तांच्या एकूण संपत्तीची विल्हेवाट करावी लागणार आहे. - लाॅकरधारकाकडे थकीत कर्ज असल्यास कर्जाच्या रकमेचा भरणा करून लाॅकर बंद करता येणार आहे. कर्ज नसेल तर १५ डिसेंबरच्या आत लाॅकरचे भाडे भरुन लाॅकर बंद करता येणार आहे. 

थकीत कर्जदारांनी बॅंकेची थकलेली रक्कम तत्काळ अदा करावी. यामुळे ठेवीदारांचे पैसे परत करण्यास मोलाचा हातभार लागेल. त्या दृष्टीने वसुली मोहीम सुरू केली आहे. अवसायकाचा कालावधी १५ वर्षांचा आहे. या कालावधीमध्ये ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासोबतच त्यांचे पैसे परत करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी सक्तीच्या वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. - नानासाहेब चव्हाणअवसायक, बाबाजी दाते महिला बँक

 

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी