नेर ग्रामपंचायतीचा कर आकारणीसाठी समिती

By Admin | Updated: December 9, 2015 03:03 IST2015-12-09T03:03:27+5:302015-12-09T03:03:27+5:30

ग्रामपंचायत कर व शुल्क नियमात सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासाठी कर आकारणी समिती गठित करण्यात आली आहे.

Committee for Taxation of Ner Gram Panchayat | नेर ग्रामपंचायतीचा कर आकारणीसाठी समिती

नेर ग्रामपंचायतीचा कर आकारणीसाठी समिती


नेर : ग्रामपंचायत कर व शुल्क नियमात सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासाठी कर आकारणी समिती गठित करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष सरपंच, तर सदस्य सचिव ग्रामसेवक राहणार आहे. उपसरपंच, जिल्हा परिषदेचे कनिष्ठ अभियंता, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हे या समितीत सदस्य राहणार असून ते कर व शुल्क नियमनाबाबत शिफारस करणार आहे.
या संदर्भात सर्व ग्रामपंचायतींना तशा सूचना करण्यात आल्या आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात सूचना मागविण्यात आल्या आहे. यानुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या सूचना फलकावर नोटीस लावण्याची सूचना ग्रामविकास विभागाने दिली आहे. सूचना व हरकतीवर विचार करून गठित समितीला कर व शुल्क आकारणीचे नियम १९६० यामध्ये सुधारणा करण्यासाठी नियमांचा मसुदा प्रस्तावित करण्यात आला आहे. दरम्यान, या संदर्भातील हरकती व सूचना राज्य शासनाकडे पाठविल्या जाणार आहेत. यात सुधारणा होवून ग्रामपंचायतीचे शुल्क व कर आकारणीसाठीही समिती राहणार आहे. कर आकारणी समितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संनियंत्रण समितीही गठित करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तर सहायक गटविकास अधिकारी सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. उपविभाग अभियंता सचिव आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Committee for Taxation of Ner Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.