‘मेडिकल’मध्ये कलर डॉपलर इको मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 05:00 AM2020-02-25T05:00:00+5:302020-02-25T05:00:15+5:30

औषध वैदकशास्त्र विभागातील अतीदक्षता कक्षात ही मशीन बसविण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना फायदा होणार आहे. ४-डी कलर डॉपलर इको मशीनचा उपयोग हृदयाच्या आजाराचे निदान करण्यासाठी होतो. हृदयाचा आकार, त्याची पंपिंग क्षमता मशीनवर तपासली जाते. याचा गोरगरीब रुग्णांना लाभ मिळणार आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून गरीब रुग्ण मेडिकलमध्ये उपचारासाठी येतात.

Color Doppler Echo Machine in 'Medical' | ‘मेडिकल’मध्ये कलर डॉपलर इको मशीन

‘मेडिकल’मध्ये कलर डॉपलर इको मशीन

Next
ठळक मुद्देरुग्णांना लाभ : हृदयाची कार्यक्षमता ओळखता येणार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक दिवसांपासून ४-डी कलर डॉपलर इको मशीनची मागणी होती. अखेर ही मशीन प्राप्त झाली आहे. औषध वैदकशास्त्र विभागातील अतीदक्षता कक्षात ही मशीन बसविण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना फायदा होणार आहे.
४-डी कलर डॉपलर इको मशीनचा उपयोग हृदयाच्या आजाराचे निदान करण्यासाठी होतो. हृदयाचा आकार, त्याची पंपिंग क्षमता मशीनवर तपासली जाते. याचा गोरगरीब रुग्णांना लाभ मिळणार आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून गरीब रुग्ण मेडिकलमध्ये उपचारासाठी येतात. मात्र यापूर्वी इको मशीन नसल्याने त्यांची बोळवण होत होती. ही मशीन वॉर्ड क्र.१९ मधील एमआयसीयू कक्षात बसविण्यात आली आहे. याठिकाणी कार्डियॉलॉजिस्ट म्हणून डॉ. अमोल चव्हाण सेवा देणार आहेत. त्यांना सहायक प्राध्यापक डॉ. तेजस मडावी, आयसीयू विभागाचे डॉ. राहुल बघेल, डॉ. राम मुरकुट सहकार्य करणार आहेत. इको मशीनच्या उद्घाटनप्रसंगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, औषध वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बाबा येलके उपस्थित होते. यावेळी सहयोगी प्राध्यापक डॉ. शेखर घोडेस्वार यांनी तपासणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
यावेळी औषध वैद्यकशास्त्र विभागातील निवासी वैद्यकीय अधिकारी, आंतरवासिता विद्यार्थी, अधिपरिचारिका, आनंद उमरे, सुनील मालके, सुदेश राठोड, अनिल वानखडे आदी उपस्थित होते.

Web Title: Color Doppler Echo Machine in 'Medical'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.