शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

ट्रॅक्टरच्या अनुदानात सत्ताधाऱ्यांचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 1:39 PM

शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी पाच लाखांचे अनुदान केंद्र शासनाने जाहीर केले. असे असतानाही महाराष्ट्राच्या कृषी आयुक्तालयाने मात्र केवळ सव्वालाखाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. तेवढ्याच अनुुदानाच्या आधारावर शेतकऱ्यांकडून अर्जही भरून घेतले जात आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची अडचण केंद्राची घोषणा ५ लाखांची, तर राज्याचा प्रस्ताव सव्वालाखाचा

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी पाच लाखांचे अनुदान केंद्र शासनाने जाहीर केले. असे असतानाही महाराष्ट्राच्या कृषी आयुक्तालयाने मात्र केवळ सव्वालाखाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. तेवढ्याच अनुुदानाच्या आधारावर शेतकऱ्यांकडून अर्जही भरून घेतले जात आहे. त्यामुळ या अनुदानाबाबत केंद्र आणि राज्य शासनात ताळमेळ नसल्याचे स्पष्ट होत आहे.कृषी यांत्रिकीकरण योजनेला चालना देण्यासाठी ट्रॅक्टरचे अनुदान चौपट करण्याची मागणी काही राज्यांनी केली होती. केंद्राने ती मान्य करीत अनुदान चौपट केले. मात्र राज्याच्या वाढीव अनुदानाची मागणी लांबणीवर टाकण्यात आली होती. यासंदर्भात कृषी आयुक्तालयाने अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून ट्रॅक्टरला केवळ सव्वा लाख रूपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला.धोरणात्मक निर्णयाची गरजविदर्भातील बहुतांश शेतकरी आर्थिक कमकुवत आहेत. पाच लाखांचे अनुदान मिळाले असते, तर दुर्बल घटकातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेतला असता. आता पैशाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. यामुळे धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.ट्रॅक्टरचे अनुदान सव्वालाख रूपयेच ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या अर्जांची छाननी जिल्हा स्तरावर सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्याला या योजनेत एक कोटी ५६ लाख रूपयांचे अनुदान मिळणार आहे.- नवनाथ कोळपकरकृषी अधीक्षक, यवतमाळ

टॅग्स :agricultureशेती